Amravati: रुग्णशय्येवरील रूपाला दिवाळीची आगळीवेगळी भेट ! एकाकी पडलेल्या नागपूरकरांनी भरला दिवाळीचा आनंद

दोन्ही पाय व कठीण जागेवरच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूपाला यंदा दिवाळीला आगळीवेगळी भेट मिळाली.
Amravati: रुग्णशय्येवरील रूपाला दिवाळीची आगळीवेगळी भेट ! एकाकी पडलेल्या नागपूरकरांनी भरला दिवाळीचा आनंद

Amravati News: दोन्ही पाय व कठीण जागेवरच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूपाला यंदा दिवाळीला आगळीवेगळी भेट मिळाली. रुग्णशय्येवर असलेल्या रूपाला भावंडांसोबत दिवाळी साजरी करता येणार नाही म्हणून लागलेली हूरहूर व ओढ काही संवेदनशील अधिकारी, समाजसेवक, पत्रकार व रुग्णालयातील स्टाफने दिलासा देत तिची दिवाळी साजरी केली.

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील प्रवेशिता रूपा शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या गेल्या ९० दिवसांपासून मेडिकल कॉलेज नागपूर येथे वॉर्ड नं. आठमध्ये भरती आहे. तिच्या दोन्ही पायांचे आणि शौचालयाच्या जागेवरच्या तीन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

दिवाळीच्या दिवशी तिला आपल्या वझ्झर येथील बहीण-भावांची आठवण येत होती. गेली २५ वर्षे आपल्या भावंडांसोबत ती दिवाळी साजरी करीत होती. परंतु यावेळी ती एकाकी पडली. तिच्या सोबत संस्थेतील एक गतिमंद मुलगी मंजुळा व संस्थेतील कर्मचारी श्रीमती मुंदेकर होत्या. तिचे रडणे पाहून डॉ. बोबडे, श्री. सिंघ आणि नर्सेस स्टाफ तिला दिलासा व शुभेच्छा देत होते.

तिची ही करुणामय व्यथेची माहिती मिळताच नागपूरमधील नागरिक, अधिकारी, समाजसेवक व पत्रकार यांनी तिला वॉर्ड नं. आठमध्ये येऊन गुलाबाची फुले, लक्ष्मीची मूर्ती, नवीन कपडे, खेळण्याच्या वस्तू, आकाशकंदील, दिवे आणि दिवाळीचा संपूर्ण फराळ देत तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व तिला आम्ही तुझ्या सोबत आहोत, असा दिलासा दिला.(Latest Marathi News)

Amravati: रुग्णशय्येवरील रूपाला दिवाळीची आगळीवेगळी भेट ! एकाकी पडलेल्या नागपूरकरांनी भरला दिवाळीचा आनंद
Vidya Balan: 'आपल्यापेक्षा ती लोकं....'! विद्या बालननं 'बॉलीवूड-टॉलीवूड' तुलनेवर केलं मोठं वक्तव्य

आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, पत्रकारांच्यावतीने सेवानिवृत्त माहिती अधिकारी अनिल गडेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अध्यक्ष श्रीमती झरनाडे, प्रकाश दुबे, कुलकर्णी, धनंजय वैद्य, बोबडे, योगेश कोठेकर व त्यांची पत्नी, डॉ. पुरुषोत्तम मडावी, चंद्रकांत मंत्री, मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर्स व नर्स यांनी एक फुलझडी आणि दिवा दिला.

त्यावेळी रूपा आनंदविभोर झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्मार्ट मोबाईल फोन दिला. नागपुरातील असंख्य जनतेने संध्याकाळपर्यंत शुभेच्छा दिल्या. (Latest Marathi News)

Amravati: रुग्णशय्येवरील रूपाला दिवाळीची आगळीवेगळी भेट ! एकाकी पडलेल्या नागपूरकरांनी भरला दिवाळीचा आनंद
Sharad Pawar: गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुपस्थित, शरद पवारांचं स्पष्टीकरण म्हणाले, 'कोणी...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com