Vidya Balan: 'आपल्यापेक्षा ती लोकं....'! विद्या बालननं 'बॉलीवूड-टॉलीवूड' तुलनेवर केलं मोठं वक्तव्य

साऊथ फिल्म इंडस्ट्री ही जास्त शिस्तप्रिय आहे. त्यांचे नियोजन चोख आहे.
Vidya Balan Actress Compare Bollywood vs Tollywood Film Industry
Vidya Balan Actress Compare Bollywood vs Tollywood Film Industry esakal

Vidya Balan Actress Compare Bollywood vs Tollywood Film Industry : विद्या बालनचं नाव केवळ बॉलीवूडच नाहीतर साऊथ फिल्म विश्वातही मोठं नाव कमावलं आहे. तिथेही तिचे खूप चाहते आहेत. विद्यानं जेव्हा द डर्टी नावाचा चित्रपट केला होता त्यावेळी तिचे बॉलीवूडसोबतच साऊथमध्ये देखील खूप कौतुक झाले होते.

आता विद्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील तिनं ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यामुळे ती बातमीचा विषय आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विद्यानं तिच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर देखील नेहमीच अॅक्टिव्ह राहणाऱ्या विद्याचा इंस्टावरील फॅन बेस मोठा आहे. विद्यानं बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये तुलना करत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

साऊथ फिल्म इंडस्ट्री ही जास्त शिस्तप्रिय आहे. त्यांचे नियोजन चोख आहे. त्यांना आपल्याला प्रेक्षकांना नेमकं काय सांगायचं आहे याचा अचूक अभ्यास आहे. मनोरंजनाची त्यांची व्याख्या वेगळी आहे. अशावेळी ही सगळी गणितं जुळून आल्यावर त्यांना मिळणारे यश आपल्यासमोर आहे. मला तर साऊथचे कलाकार जास्त शिस्तप्रिय वाटतात. असं विद्यानं म्हटले आहे.

विद्या ही स्वता एका साऊथ इंडियन कुटूंबातून आली आहे. तिनं मसाबा गुप्ता सोबत एका मुलाखतीमध्ये तिच्या साऊथ इंडियन वातावरणावर भाष्य केले आहे. मी नेहमीच वेगळ्या वातावरणात वाढले आहे. त्यामुळे काही गोष्टींबाबत मी ठामपणे सांगू शकते. साऊथ मध्ये लोकं त्यांच्या कामाप्रती जास्त शिस्तप्रिय आणि काटेकोर असल्याचे दिसून आले आहे.

विद्यानं यावेळी केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुकचं केलं नाहीतर तिनं बॉलीवूडसोबत त्याची तुलना देखील केली आहे. ती म्हणते, साऊथमधील चित्रपट हे छोट्या बजेटचे असतात. मात्र तरीही ते कमालीचे यशस्वी होतात. मीडियम साईजच्या त्या चित्रपटांसाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे त्यांचे यशस्वी होणं जास्त महत्वाचे आहे. मी कधीही मोठ्या हिंदी मेगा प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही. त्यामुळे मला त्याविषयी सांगता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com