

Amravati Crime
esakal
अमरावती : शहरातील एका महाविद्यालयात प्रॅक्टिकल लिहून न दिल्याच्या कारणावरून संशयित युवकाने विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून उघडकीस आली.
नवीन मेघराज वनवानी (वय १९, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा), असे अटक हल्लेखोर विद्यार्थ्याचे नाव असून, बडनेरा पोलिसांनी त्याला मंगळवारी (ता. २९) सायंकाळी अटक केली. त्याला तपास यंत्रणेने बुधवारी (ता. ३०) जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी (ता. २९) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास फार्मसी महाविद्यालयाच्या लॉबीतील पायऱ्यांवर संशयित आरोपीने विद्यार्थिनीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते.
जखमी विद्यार्थिनीच्या भावाने बडनेरा ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये मागील काही दिवसांपासून नवीन वनवानी हा तिला प्रॅक्टिकल लिहून देण्यासाठी दबाव टाकत होता.
त्यातून त्याने मुलीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्येचा प्रयत्न केला. युवतीची प्रकृती स्थिर जखमी युवतीवर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस निरीक्षक हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.