वाहनांसह बकऱ्या चोरीतील टोळी पोलिसांना सापडली; दोघांना अटक; टाटा सुमोसह रोकड जप्त

Amravati police caught thief gang
Amravati police caught thief gang

अमरावती ः टाटासुमो, बोलेरो, पीकअप सारख्या वाहनांसह बकऱ्या चोरणारी टोळी पोलिसांना सापडली. त्यातील दोघांना अटक झाली असून, दोघे पसार आहेत. दोघांकडून एक सुमो, चार बकऱ्या व रोख रक्कम जप्त केली.

नाजीम खान मुस्तफा खान (वय 25), अजहर अफसर खान पठाण (वय 23, दोघेही रा. वघाड, वरुड), अशी अटक दोघांची नावे आहेत. याप्रकरणात बंटी ऊर्फ सौरभ मनोज नंदेश्‍वर (वय 23) व अशफाक अन्सारी अनिस अन्सारी (दोघेही रा. नागपूर) हे पसार आहेत. चौघांविरुद्ध बेनोडा ठाण्यात बकऱ्या चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

किशोर विठ्ठल पोहने (वय 29, रा. वघाळ) यांच्यासह यादव इंगळे यांचीही बकरी काही दिवसांपूर्वी चोरीस गेली होती. बेनोडा पोलिसांनी वघाळ येथील दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी बकऱ्या, मालवाहू वाहन आणि टाटासुमो चोरी केल्याची कबुली दिली. 

अटक नाजीम खान व अजहर खान या दोघांकडून पोलिसांनी एमएच 23 वाय 1382 क्रमांकाची टाटासुमो, 3 हजारांची रोख रक्कम, अशी 2 लाख 3 हजार रुपयांची सामग्री जप्त केली. जप्त सुमो ही चांदूरबाजार तालुक्‍यातील शिरसगावकसबा ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली, तर बोलेरो पीकअप व्हॅन याच चौघांच्या टोळीने नागपूर जिल्ह्याच्या जलालखेडा गावातून चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com