अमरावतीत विवाहितेवर तिघांनी केला अत्याचार; गुन्हा दाखल

In Amravati, three people tortured a married woman
In Amravati, three people tortured a married woman

अमरावती : दोघेही विवाहित, पण त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांना मदतीला घेऊन नातेवाइकांकडे आलेल्या विवाहितेवर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात बुधवारी (ता. नऊ) रात्री गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सामोपचाराचा प्रस्ताव पोलिसांपुढे ठेवल्या गेला. मात्र, आधीच गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी साजन श्‍यामा भोसले याच्यासह त्याला याप्रकरणात मदत केल्याचा आरोप असलेले संशयित श्‍यामदास श्‍याम भोसले व कोलट्या भोसले यांना अटक केली. तिघांविरुद्ध बुधवारी (ता. नऊ) रात्री पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित विवाहिता बेड्यावर आपल्या नातेवाइकांकडे आली. तिची आधीपासूनच तिघांपैकी साजन भोसले सोबत ओळख होती.

साजनने पाच मे रोजी सायंकाळी दुचाकीवर बसवून तिला जंगलातील एका टेकडीवर नेले. त्याठिकाणी साजन याने अत्याचार केला. त्याच्या मदतीला श्‍यामदास व कोलट्या हे दोघे होते. त्यानंतर पीडित ही आपल्या गावी निघून गेली. ती तक्रार देण्यासाठी फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचली. तिने आरोप केलेल्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. तक्रार नोंदविल्यावर गुन्हा दाखल झाल्याने साजनसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली.

बेड्यावरील शंभरच्या आसपास लोक गुरुवारी (ता. दहा) फ्रेजरपुरा ठाण्यावर धडकले. त्यापैकी साजन साने त्याच्यावर दाखल अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्याच्या अटीवर पीडितेसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला, असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. परंतु, आधीच एफआयआर दाखल झाल्याने त्यांच्यात आता ठाण्याच्या स्तरावर समेट घडविणे शक्‍य नव्हते. दुपारपर्यंत महिला, पुरुषांचा जमाव ठाण्यावर कायम होता. तिघांनाही पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले.

ठाण्याच्या स्तरावर तडजोड शक्‍यच नाही
पीडितेची गंभीर स्वरुपाची तक्रार असल्याने आणि त्यातही एफआयआर दाखल झाल्यामुळे त्यांच्यात ठाण्याच्या स्तरावर तडजोड शक्‍यच नाही. त्यामुळे पोलिसांना नियमानुसार कारवाई करावी लागली.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com