esakal | बाळाच्या आगमनासाठी उत्साहात होते संपूर्ण कुटुंबीय मात्र आली ही दुःखद बातमी

बोलून बातमी शोधा

new born baby

अचलपूर तालुक्‍यातील सावळी धातुरा येथील रहिवासी असलेल्या उर्मिला झारखंडे (वय 23) या गर्भवतीच्या पोटात दुखायला लागल्याने कुटुंबीयांनी सर्वप्रथम मंगळवारी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री 10 वाजेच्या सुमारास दाखल केले.

बाळाच्या आगमनासाठी उत्साहात होते संपूर्ण कुटुंबीय मात्र आली ही दुःखद बातमी
sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागताच कुटुंबातील प्रत्येकजण अगदी उत्साहात असतात. प्रत्येक जण त्या विशेष दिवसाची वाट पाहत असतो. आईवडिलांच्या आनंदाची तर काही सीमाच नसते. असाच एक पाहुणा घरी येणार म्हणून अचलपूर येथील झारखंडे कुटुंबीय आनंदात होते. स्वागताची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र त्यांच्या संपूर्ण आनंदावर विरजण पडले.

अचलपूर तालुक्‍यातील सावळी धातुरा येथील रहिवासी असलेल्या उर्मिला झारखंडे (वय 23) या गर्भवतीच्या पोटात दुखायला लागल्याने कुटुंबीयांनी सर्वप्रथम मंगळवारी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री 10 वाजेच्या सुमारास दाखल केले. मात्र येथील डॉक्‍टरांनी नेहमीप्रमाणे अमरावती येथे रेफर केले. त्यानंतर रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी अमरावती येथील डफरीन स्त्री रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी बुधवारी गर्भवती महिलेचे सीझर करण्यात आले. 

डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप 
यामध्ये या महिलेने दुपारी एक वाजून 28 मिनिटांनी पहिल्या बाळाला जन्म दिला, तर एक वाजून 30 मिनिटांनी दुसऱ्याला जन्म दिल्याची माहिती मृत महिलेच्या पतीने दिली. सर्वकाही सुरळीत असताना अचानकपणे शनिवारी (ता. नऊ) पहाटे दोन वाजून 55 मिनिटांनी मृत्यूची माहिती डॉक्‍टरांनी पतीसह नातेवाइकांना दिली. मात्र नेमका मृत्यू कशाने झाला, हे डॉक्‍टरांनी नातेवाइकांना सांगितले नाही. दरम्यान, उपचारात हयगय केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेचे पती गोविंद झारखंडे यांनी केला. तसेच दोन्ही मुले सुखरूप असल्याचे सांगितले. कोरोनाच्या सावटात महिलेवर सावळी धातुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

भारतीय तिरंदाजीच्या इतिहासातला पहिला प्रयोग, होणार  ऑनलाइन प्रशिक्षण

सदर महिलेच्या मृत्यूबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकिसक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते व्हीसीमध्ये व्यस्त होते. परिणामी महिलेचा मृत्यू कशाने झाला याबाबतची माहिती कळू शकली नाही. 

रात्री 10 च्या सुमारास गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या महिलेचे सीझर करणे गरजेचे असल्याने त्यांना अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर माहिती नसल्याने मृत्यू नेमका कशाने झाला, हे सांगू शकत नाही. 
- श्रीकांत धुमाळे 
स्त्रीरोगतज्ज्ञ उपजिल्हा रुग्णालय अचलपूर.