तुझ्यासोबत बोलायच आहे अस म्हणत टवारखोर युवकाने केला युवतीचा विनयभंग

संतोष ताकपिरे
Saturday, 22 August 2020

चांदुररेल्वे येथील दुसऱ्या घटनेत पीडित युवती रस्त्याने एकटी जात असताना संशयित आरोपी अमोल देवचंद कांबळे (वय ३३) याने तिला रस्त्यात अडविले. अश्लील चाळे करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला प्रतिसाद देण्याचे टाळताच अमोलने मुलीचे गावातील इतर मुलांसोबत अफेअर सुरू असल्याची बदनामी केली.

अमरावती : ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसह महिलेच्या छेडखानीच्या घटनांना आळा बसलेला नाही. वरुड तालुक्‍यात अल्पवयीन मुलीला तुझ्याशी बोलायच असल्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. तर चांदुररेल्वे तालुक्‍यात अल्पवयीन मुलीचे इतर मुलांसोबत अफेयर असल्याचा संशय घेऊन युवकाने बळजबरीचा प्रयत्न केला. अशा वाढत्या घटनांमुळे युवतींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुड येथील एक युवती आपल्या लहान बहिणीसोबत डेअरीमधून घराकडे परतत होती. त्याचवेळी शाळेजवळ संशयित आरोपी बाबा उर्फ सोहेल उमर शहा (वय १८) याने तिला अडविले. तिच्यासोबत बोलण्याचा प्रस्ताव ठेवला. मुलीने त्याला नकार कळविताच बाबा चिडला.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

त्याने अश्‍लील वर्तन करीत तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तो मागील वर्षभरापासून पीडितेचा पाठलाग करून त्रास देत होता. तसेच शिवीगाळ करीत होता. असा आरोप पीडितेने वरुड पोलिसांत दाखल तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाबा उर्फ सोहेलविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

चांदुररेल्वे येथील दुसऱ्या घटनेत पीडित युवती रस्त्याने एकटी जात असताना संशयित आरोपी अमोल देवचंद कांबळे (वय ३३) याने तिला रस्त्यात अडविले. अश्लील चाळे करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला प्रतिसाद देण्याचे टाळताच अमोलने मुलीचे गावातील इतर मुलांसोबत अफेअर सुरू असल्याची बदनामी केली. असा आरोपी पीडितेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल कांबळेविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

महिलेची घरात घुसून छेडखानी

विवाहितेच्या छेडखानीची एक घटना धारणी तालुक्‍यातील एका गावात घडली. महिला घरात एकटी असताना संशयित आरोपी संजू नानकराम कास्देकर याने महिलेच्या घरात घुसून तिची छेडखानी केली. महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी कास्देकरविरुद्ध विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीसाठी - कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

नवविवाहितेची टारगट युवकाविरुद्ध तक्रार

काही दिवसांपूर्वी नवविवाहितेला एका व्यक्तीकडून त्रास सुरू झाला. त्याने तिला चक्क शारीरिक संबंधासाठी होकार न दिल्यास पतीला फसवेल अशी धमकी दिली होती. जून २०२० मध्ये नवविवाहिता घरी एकटीच असल्याचे बघून कसलाही विचार न करता प्रफुल्ल तिच्या घरी गेला. तिच्यावर असलेले एकतर्फी प्रेम त्याने बोलताना व्यक्त केले. तसेच थेट शारीरिक संबंधाची मागणी केली होती. त्याने स्वत:चा एक मोबाईल सुद्धा दिला व बोलण्याचा आग्रह केला होता. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Amravati, the youth molested the three