महिलांनी आणखी किती सहन करायचे? नवनीत राणा संसदेत भडकल्या

Navneet Rana
Navneet Rana

नवी दिल्ली : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेच्या अंगावार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी संसदेतही उमटले. महिलांनी किती अत्याचार सहन करायचा? महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर अतिशय कडक कायदा केला पाहिजे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यांनी संसदेत केली.

महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त 'तारीख पे तारीख' दिली जाते, असा संताप त्यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांना व्यक्त केला. एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली अहे. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पीडित प्राध्यापिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरीही येते अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असून तिची श्‍वासनलिका जळल्यामुळे तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असून कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेवले असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. धोका अजून टळलेला नसून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे उॉक्‍टरांनी सांगितले.

पीडितेवर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असून तिच्यावरील उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमागील सत्य अजून उलगडलेले नाही. पुढील तपास सुरू आहे. पीडितेचा चेहरा पूर्ण भाजला असून डोळे आणि वाचाही गेल्याचा संशय डॉक्‍टरांना आहे.

- गेम' होण्यापूर्वीच काढला काटा; अडीच महिन्यानंतर "मर्डरमिस्ट्री'चा उलगडा

हिंगणघाट येथे उफाळला जनआक्रोश; मृत्युदंडाची मागणी
या अमानवीय घटनेचे पडसाद दिवसभर शहरात पाहायला मिळाले, सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको यात उस्फूर्तपणे महिला, शाळकरी मुलं, महाविद्यालयीन युवती यांनी घराबाहेर पडून मोर्चात आपला सहभाग नोंदविला, महामोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला येथे मोर्चेकरांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांनी बनलेली मानवी साखळी तोडून थेट उपविभागीय कार्यालयात धडक दिली, या समाजकंटकांला फासावर लटकवा ही एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांची केली, या मोर्चाचा आक्रोश पाहून प्रशासनही हादरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com