अंकिता जळीतकांड सुनावणी: आरोपीचे वकीलच न्यायालयात गैरहजर; पुढील सुनावणी २० एप्रिलला 

शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली
शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीत आज, शुक्रवारी आरोपीचे वकील गैरहजर राहिले. परिणामी, या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी २० एप्रिलला होणार आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. मागील तीन दिवसांत १३ साक्ष आटोपल्या. पाच व सहा एप्रिलला प्रत्येकी पाच तर 8 एप्रिलला तीन साक्ष घेण्यात आल्या. 

यातील वोडाफोन व जिओचे नोडल अधिकारी बाहेरगावी असल्याने कोरोनाच्या संक्रमणामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडल्या.

८ एप्रिलला या प्रकरणाच्या तपास अधिकारी उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव यांची बचाव पक्षातर्फे होणारी उलट तपासणी अपूर्ण राहिली होती. ती आज पूर्ण होणार होती, परंतु आरोपीचे वकील भूपेंद्र सोने आज न्यायालयीन कामकाजात गैरहजर असल्याने तृप्ती जाधव यांची उलट तपासणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी २० एप्रिलला होईल. शुक्रवारच्या न्यायालयीन कामकाजाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com