मेडिकलच्या कृत्रिम अवयव केंद्रालाच आले अपंगत्व, साहित्य अन् मनुष्यबळाची कमतरता

artificial limbs center of nagpur government medical college not working
artificial limbs center of nagpur government medical college not working

नागपूर : अपंग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (मेडिकल) कृत्रिम अवयव केंद्र (लीम्ब सेंटर) अपयशी ठरत आहे. मनुष्यबळाचा तुटवडा तसेच कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याचा वेळेवर पुरवठा होत नाही. यामुळे या सेंटरवर अवकळा पसरली आहे. 

मेडिकलमधील कृत्रिम अवयव केंद्रात कॅलिपर, स्पायनल ब्रेस, मोल्डेड शूपासून कृत्रिम अवयवांची निर्मित होते. मेडिकलमध्ये येणारा अपंग साधारणपणे दारिद्य्ररेषेखालील असतो. त्यांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यात मेडिकलचे प्रशासन आता अपयशी ठरत आहे. मेडिकलमध्ये कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी बीपीएल यादीतील अपंग बांधवांना आवश्‍यक असलेल्या कॅलिपर, सर्जिकल शू, मोल्डेड शू, कंबरेचा आणि मानेचा पट्टा बनवण्याचा अर्ज सादर करावा लागतो. तो मंजूर झाल्यानंतर साहित्य उपलब्ध होते. मात्र, येथे कधी लेदर येते, तर कधी इतर साहित्य नसते. यामुळे अपंग बांधव खेटा घालतात. अखेर त्रासून निघून जातात.

विशेष असे की, राज्यात नागपूर आणि औरंगाबाद असे दोनच ठिकाणी लीम्ब सेंटर आहेत. बरेच दिवस 'बायो इंजिनिअर' हे पद प्रभारावर होते. आता या पदावर नियुक्ती झाली आहे. प्रॉस्थेटिक, आर्थोटिक तंत्रज्ञांपासून शुमेकर व इतर पदे रिक्त आहेत. यामुळे या सेंटरलाच अपंगत्व आल्याचे चित्र येथे दिसत आहे. पूर्वी दर दिवसाला येथे एकतरी अपंग येत असे. आता या कार्यालयात अपंग क्वचित दिसतो. साहित्य मिळत नसल्याने अपंग लाभार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. 

अवघे चार हात -
शेकडो अपंगांसाठी कॅलिपर, सर्जिकल शू, मोल्डेड शू, कंबरेचा, मानेचा पट्टा तयार करण्यासाठी आता अवघे चार हात मेडिकलमध्ये उरले आहेत. साहित्य आणि तंत्रज्ञानाअभावी सहा महिन्यांपेक्षाही जास्त प्रतीक्षा अपंगांना करावी लागते. यानंतरही त्यांना साहित्य मिळत नाही. यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com