बापरे! डॉक्टर उपचारासाठी घरी येत नसल्याने मद्यपीने उगारले शस्त्र; भीतीमुळे दवाखानाच बंद

सूरज पाटील
Tuesday, 15 September 2020

संशयित कोंडबा जाधव व ज्ञानेश्वर इंगोले या दोघांनी उपचारासाठी घरी येत नाही. तपासणी शुल्क मागत असल्याने हुज्जत घातली. नागरिकांसमोर चक्क चाकू उगारला. या बाबतची लेखी तक्रार डॉ. जाजडा यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली.

दिग्रस (जि. यवतमाळ) : उपचार करण्यासाठी घरी येत नसल्याने वाद करीत मद्यपीने शिवीगाळ करीत चक्क डॉक्‍टरवरच चाकू उगारला. ही खळबळजनक घटना तालुक्‍यातील डेहणी येथे शुक्रवारी (ता. ११) घडली. हल्ला होण्याच्या भीतीने दुसऱ्या दिवसापासून डॉक्‍टरने आपला दवाखानाच बंद ठेवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामेश्‍वर जाजडा मागील तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. दिग्रस येथून डेहणीला अपडाऊन करतात. कोविड काळात ग्रामीण भागातील जनतेवर उपचार करता, यावे यासाठी त्यांनी आपल्या रुग्णालयाच्या वेळेत सकाळी व सायंकाळपर्यंत एका तासाने वाढ केली आहे.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

संशयित कोंडबा जाधव व ज्ञानेश्वर इंगोले या दोघांनी उपचारासाठी घरी येत नाही. तपासणी शुल्क मागत असल्याने हुज्जत घातली. नागरिकांसमोर चक्क चाकू उगारला. या बाबतची लेखी तक्रार डॉ. जाजडा यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली.

कोरोना योद्घा म्हणून डॉक्‍टरांचा सन्मान होत असताना दुसरीकडे हल्ला होण्याच्या भीतीमुळे डॉक्‍टरला आपला दवाखाना बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात वैद्यकीय संघटना, गृहमंत्री यांच्याकडे डॉ. जाजडा दाद मागणार आहे. दवाखाना बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

कोरोना योद्धा डॉक्‍टरच असुरक्षित

कोरोना संसर्गाचा धोका असताना डॉक्‍टर्स रुग्णांवर उपचार करून बरे करीत आहे. त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. अशात डॉक्‍टरांवर हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोरोना योद्घा डॉक्‍टरांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on doctor in Yavatmal