esakal | मोठी बातमी! अमरावती जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षांना जबर मारहाण; सोन्याची चेन लुटल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

attack on ex zp president of amravati marathi latest news

एमएच 27 बीई 4313 क्रमांकाच्या कारने वडिलांची भेट घेऊन परत घराकडे जात असताना रात्री बियाणी चौकात त्यांच्या कारचा धक्का दुसऱ्या कारला लागला. 

मोठी बातमी! अमरावती जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षांना जबर मारहाण; सोन्याची चेन लुटल्याचा आरोप

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः विद्यापीठ मार्गावरील बियाणी चौकात कारचा धक्का लागून किरकोळ अपघात झाल्यामुळे चिडलेल्या दुसऱ्या वाहनातील व्यक्तींनी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना मारहाण केली. शिवाय त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही जबरीने हिसकावून नेली.

शनिवारी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. श्री. गोंडाणे यांच्या वडिलांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते एमएच 27 बीई 4313 क्रमांकाच्या कारने वडिलांची भेट घेऊन परत घराकडे जात असताना रात्री बियाणी चौकात त्यांच्या कारचा धक्का दुसऱ्या कारला लागला. 

हेही वाचा - नैसर्गिक आपत्तीनंतरही वाढली सोयाबीनची आवक, तीन लाख क्विंटलची तफावत

त्याचवेळी धक्का बसलेल्या कारचालक व श्री. गोंडाणे यांच्यामध्ये रस्त्यावरच शाब्दिक वाद झाला. दुसऱ्या कारमधील दोघांनी गोंडाणे यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली, असा आरोप नितीन गोंडाणे यांनी गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला. या घटनेनंतर मार्गावर बरेच लोक जमले होते.

कारचालकास धक्का लागल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने धक्काबुक्की करून चेन हिसकावल्याने पोलिसांत तक्रार नोंदविली.
-नितीन गोंडाणे, 
माजी अध्यक्ष, जि. प. अमरावती.

हेही वाचा - बापरे! नागपुरात ३५ पेक्षा अधिक शाळा अनधिकृत, कारवाई होणार का?

श्री. गोंडाणे यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून चेन लुटल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याप्रकरणाची चौकशी केली जाईल.
-मनीष ठाकरे, 
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image