esakal | नैसर्गिक आपत्तीनंतरही वाढली सोयाबीनची आवक, तीन लाख क्विंटलची तफावत
sakal

बोलून बातमी शोधा

soybean import increase in amravati apmc

अमरावती बाजार समितीत आतापर्यंत या हंगामात 6 लाख 97 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली आहे. ऑक्‍टोबरमध्ये सुरू झालेल्या हंगामात 3 लाख 52 हजार 71 व नोव्हेंबरमध्ये 1 लाख 49 हजार 257 क्विंटल सोयाबीन आला.

नैसर्गिक आपत्तीनंतरही वाढली सोयाबीनची आवक, तीन लाख क्विंटलची तफावत

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : यंदा अतिपावसाने खरिपातील सोयाबीनला तडाखा बसल्याने उत्पादनाची सरासरी घसरली. मात्र, तरीही गतवर्षीच्या तुलनेत सध्या येत असलेली आवक बघता फारशी तफावत आढळून आली नाही. वर्षातील अखेरच्या महिन्यात सोयाबीनची खुल्या बाजारातील आवक वाढली आहे. येथील बाजार समितीत डिसेंबर अखेरीस 6 लाख 97 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. विशेष म्हणजे, शासकीय खरेदी केंद्रावर या हंगामात केवळ 12 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण, 'पीडब्ल्यूडी...

कोरोना संक्रमण व पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी खरीप हंगामात चांगलाच त्रस्त झाला. पेरणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आधीच त्रासलेल्या शेतकऱ्यांना नंतर पावसाचा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यातील 43 हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन अक्षरशः वाया गेले. हंगामाच्या अखेरीस काढणीनंतर सोयाबीन बाजारात आले. गेली दोन महिने शांत असलेल्या सोयाबीनच्या बाजारात डिसेंबरमध्ये मात्र तेजी आली. मध्य प्रदेशात सोयाबीनचे उत्पादन तुलनेने फार कमी झाल्याने राज्यातील सोयाबीनला मागणी वाढली व त्यामुळे हमीदराच्या तुलनेत खुल्या बाजारात भाव चढे मिळू लागले आहेत. त्याचा परिणाम शासकीय खरेदीवर झाला. शासकीय केंद्रांवर केवळ 12 क्विंटल सोयाबीन विकला गेला.

हेही वाचा - बापरे! नागपुरात ३५ पेक्षा अधिक शाळा अनधिकृत, कारवाई होणार का?

अमरावती बाजार समितीत आतापर्यंत या हंगामात 6 लाख 97 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली आहे. ऑक्‍टोबरमध्ये सुरू झालेल्या हंगामात 3 लाख 52 हजार 71 व नोव्हेंबरमध्ये 1 लाख 49 हजार 257 क्विंटल सोयाबीन आला. हमीदराच्या तुलनेत या सोयाबीनला चढे दर मिळालेत. हंगाम आटोपण्याच्या कालावधीत म्हणजे डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख 96 हजार 474 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सुपर दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षाही अधिक 4300 रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे.

हेही वाचा - बलात्कारासह खुनाच्या घटनांमध्ये घट होऊनही नागपूर गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर का? गृहमंत्री...

आणखी सोयाबीन येणार -
गतवर्षी संपूर्ण वर्षभरात (एप्रिल ते मार्च) 10 लाख 29 हजार 261 क्विंटल सोयाबीनची आवक अमरावती बाजार समितीत झाली. यंदा हंगामाच्या सुरुवातीस तीनच महिन्यांत 6 लाख 97 हजार क्विंटल सोयाबीन आले. अद्याप हंगाम संपला नसून आणखी आवक येण्याची शक्‍यता आहे.
 

loading image
go to top