Crime News : धक्कादायक! सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग; २२ वर्षीय आरोपीला अटक

Crime News
Crime Newsesakal

पातूर (अकोला) : शहरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शहरात राहत असलेल्या एका युवकाने अतिप्रसंग केल्याची घटना २ मे रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पातूर शहरातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर ती शाळेत जात असताना आरोपी वाईट उद्देशाने पाठलाग करत होता.

Crime News
Everest Base Camp : साठीतील दोघींचा महापराक्रम; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केली यशस्वी चढाई

तसेच २ मे रोजी पीडितेच्या घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत घरात शिरून आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढून तिचा विनयभंग करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू नकार दिल्यास तुझ्या अंगावर ऍसिड फेकेल’ अशी धमकी दिली.

या घडलेल्या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. सायंकाळी तिची आई घरी आली असता, तिने घडलेला प्रसंग आईकडे कथन केला. पीडितेच्या आईने क्षणाचा विचार न करता थेट पातूर पोलिस स्टेशन गाठून झालेल्या घटनेबाबत तक्रार दिली.

Crime News
Sharad Pawar Resigns: "खर्गेंनी शरद पवारांचा आदर्श घ्यावा", निलंबित काँग्रेस नेत्याचं विधान

फिर्यादीच्या फिर्यादीवरून पातूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम (वय २२) याचेविरुद्ध कलम ४५२, ३५४ (ड), ५०६ भादंवि सहकलम ८, १२ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक ठाणेदार मिरा सोनुने यांनी आरोपी शेख सोहेल उर्फ राजू शेख ईमाम याला अटक केली. वृत्त लिहीपर्यंत आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com