न्यायासाठी आई-वडिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; मुलीचे अपहरण करून हत्या झाल्याचा आरोप

Attempts by parents to self immolate for justice Gondia news
Attempts by parents to self immolate for justice Gondia news

गोंदिया : घरूनशिकवणी वर्गासाठी निघालेल्या माझ्या मुलीचा अपघात झाला नाही, तर अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींवर अपहरण, लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून घेण्यास रामनगर पोलिस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत पीडित दुर्वास भोयर व पत्नीने येथील प्रशासकीय इमारतीसमोर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.

मरारटोली येथील दुर्वास भय्यालाल भोयर (वय ४३) यांची १४ वर्षीय मुलगी पुणाटोली येथे शिकवणीवर्गाकरिता नेहमीप्रमाणे १६ जानेवारीला देखील दुपारी गेली होती. सायंकाळच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील भागवतटोलाजवळच्या एका गोदामाजवळ ती जखमी अवस्थेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आढळली. तिला येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

सहयोग हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर भोयर दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये गेले. यावेळी त्यांच्या मुलीच्या कपाळ व डोक्‍यावर गंभीर इजा होती. उपचारादरम्यान मुलीचा १७ जानेवारीला सकाळी मृत्यू झाला. मात्र, शिकवणीवर्गाच्या बाहेर काही युवकांनी तिचे अपहरण केले. गोंदियाच्या बाहेर जाऊन तिरोडा रस्त्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि डोक्‍यावर वार करून रस्त्यात फेकून दिले असा, आरोप वडील दुर्वास भोयर यांनी केला.

याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी ते रामनगर पोलिस ठाण्यात गेले. एकदा नव्हे, चारदा पोलिस ठाण्याच्या चकरा मारल्या. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत परत पाठविले. या घटनेला फक्त मुलगी मित्रांसोबत फिरायला गेली व परत येताना रस्त्यावर पडून तिचा मृत्यू झाला, असे सांगून पोलिस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा आरोपही भोयर यांनी केला आहे.

अपहरण करून मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करावा, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करीत दुर्वास भोयर व पत्नीने गुरुवारी येथील प्रशासकीय इमारतीसमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com