म्युकरमायकोसिस : लक्षणे आणि उपाय; डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळा धोका

म्युकरमायकोसिस : लक्षणे आणि उपाय; डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळा धोका

नागपूर : म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार (Mucor mycosis is a fungal disease) होता. कोरोनाने (coronavirus) थैमान घातले असताना आणि यातून लोक सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच म्युकरमायकोसिस या आजाराने डोकं वर काढले आहे. या आजाराचा सर्वाधिक धोका कोरोनातून बरे झालेल्यांना आहे. हा बुरशीजन्य आजार असून, अतिशय वेगाने पसरत आहे. काळी बुरशी, पांढरी बुरशीनंतर आता आरेंज बुरशीचे रुग्णही आढळून येत आहेत. वेळीच उपचार घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. या आजाराची कोणती लक्षणे आहेत आणि कोणत्या उपाययोजना आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. (Avoid the risk of Mucor mycosis with timely treatment)

म्युकरमायकोसिस हा अतिजलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करीत असतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सर्वाधिक धोका आहे. ज्याप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोना आपल्या विळख्यात घेतो, त्याचप्रमाणे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार बळावतो. ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिसचा धोका टाळता येऊ शकतो.

म्युकरमायकोसिस : लक्षणे आणि उपाय; डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळा धोका
Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

म्युकरमायकोसिस हा विषाणू साधारणपणे नाक किंवा सायन्सच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी सहा आठवड्यांपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. हा रोग बळावल्यास दृष्टी आणि जिवाला धोका पोहोचू शकतो.

मात्र, वेळीच उपचार घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच काही तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसवर उपचार केले नाही तर दगावण्याची शक्यता वाढते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.

म्युकरमायकोसिसची लक्षणे

  • चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे

  • अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे)

  • नाक चोंदणे, नाकावर सूज येणे

  • एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव

  • चेहरा अथवा डोळ्यावर सूज

  • एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे

  • वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे

  • अस्पष्ट दिसणे

  • ताप

  • गालावर सूज येणे, बधिरपणा येणे

  • जबड्याच्या वरच्या भागाला छिद्र पडणे

  • नाकातील त्वचेचा रंग काळसर होणे

  • नाकाच्या वरच्या भागाला काळसर डाग पडणे

  • डोळ्याच्या आजूबाजूला, सायन्सच्या आजूबाजूचा भाग सुजणे

म्युकरमायकोसिस : लक्षणे आणि उपाय; डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळा धोका
फडणवीस यांचा इशारा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास आंदोलन करणार

म्युकरमायकोसिसवर प्रतिबंधात्मक उपाय

  • रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा

  • कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करा

  • डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉइड घेऊ नका

  • टूथब्रश/मास्क वरचेवर बदला

  • वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवा

  • जमिनीखाली लागणाऱ्या भाज्या नीट स्वच्छ धुऊन खा

  • मातीत काम करताना व खतांचा वापर करताना पूर्ण बाहीचा शर्ट, फुलपँट, हातात ग्लोव्हज घाला

  • नाका, तोंडावर मास्क लावा

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाकात बेटाकींड रेडी ०.५ टक्के सोल्यूशनचे दोन थेंब टाका

  • बेटाकीं रेडी किंवा बेटाडीन ओरल सोल्यूशनने दिवसातून दोनवेळा गुळण्या करा

  • धूर किंवा माती, चूल पेटविण्याच्या ठिकाणी संपर्क टाळा

  • त्वचेवर जखम असलेला भाग साबण, पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या

  • घरात खेळती हवा असावी

  • घरात बुरशी जमा होणार नाही याची काळजी घ्या

कारण कोणतेही असो, एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रामुख्याने कोरोनापश्चात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने तसेच कोरोनाच्या उपचारातील रेमडेसिवर, स्टेरॉईड व अँटिबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे तसेच उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरूप पहावयास मिळतात. प्रतिजैविकांचा अतिवापर टाळावा. तसेच ऑक्सिजन सिलिंडरच्या ह्यूमिडिफायरमधे डिस्टिल वाटरचा वापर करावा.
- डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख, मेडिसीन, मेडिकल

(Avoid the risk of Mucor mycosis with timely treatment)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com