Bachu Kadu : बच्चू कडूंचा ‘प्रहार’ कुणावर?

दुसरीकडे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे मैदानात उतरले आहेत.
Bachu Kadu
Bachu Kadue sakal

अमरावती ः अमरावती लोकसभा निवडणुकीत अनेक वर्षांनी भाजप व काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार आमने-सामने आहेत. आजवर ही जागा महायुती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या ताब्यात राहिली आहे. गेल्या निवडणुकीत (सन २०१९) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीत राणा यंदा भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे मैदानात उतरले आहेत.

Bachu Kadu
Jalgaon News : गिरणा धरणातून आज तिसरे आवर्तन सुटणार; दाहकतेने हैराण जळगावकरांना आजपासून दिलासा

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांच्या रूपात उमेदवार दिल्याने वाटते तेवढी निवडणूक सोपी राहिलेली नाही. सोमवारी (ता. आठ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेतात, यावर सुद्धा राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Bachu Kadu
Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा विचार करणे देखील तेवढेच महत्त्वाचे राहणार असल्याचे मानले जाते. प्रहार हा राज्यातील महायुतीतील घटक पक्ष आहे. परंतु त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यांनी दिलेला उमेदवार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीत एकाच वेळी फूट पडल्याचे चित्र आहे.

‘संघटन’ विरुद्ध ‘गठबंधन’

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून वर्धा लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे होता. २०२४ लोकसभेत ही जागा पहिल्यांदाच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला गेली. असे असले तरी उमेदवाराकरिता त्यांना चांगलेच भटकावे लागले. अखेर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना ऐनवेळी पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली. गेल्या दोन निवडणुकांपासून येथे भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी वर्धा लोकसभेत महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या थेट लढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com