esakal | अवकाळीने केला पुन्हा शेतकऱ्यांचा घात; ‘केळी’सह झाले अनेक पिकांचे नुकसान 
sakal

बोलून बातमी शोधा

ke

दानापूर येथील शेत सर्वे नं, 153 मध्ये मंगळवारी (ता.29) दुपारी झालेल्या जोरदार वाऱ्याने काढणीसाठी आलेली केळी बागा उद्धवस्त झाल्याने शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. हिवरखेड येथील शेतकरी विनोद रेखाते यांची शेती दानापूर येथून जवळच असलेल्या सोगोडा येथील शेतकरी सुभाष हागे व डिगांबर हागे यांनी शेती लागवड पद्धतीने केली आहे.

अवकाळीने केला पुन्हा शेतकऱ्यांचा घात; ‘केळी’सह झाले अनेक पिकांचे नुकसान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दानापूर (जि. अकोला) : तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात फळबागांची शेती केली जाते. त्यामध्ये केळीच्या बागांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मंगळवारी (ता.29) परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या बागा उद्धवस्त झाल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने केळीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

हेही वाचा- धक्कादायक ः वाळू माफियाचा प्रताप; पोलिस कर्मचाऱ्याला टिप्परखाली चिरडले

लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे फळबाग, भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, या पिकांवर आता आस्मानी संकट आल्याने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दानापूर येथील शेत सर्वे नं, 153 मध्ये मंगळवारी (ता.29) दुपारी झालेल्या जोरदार वाऱ्याने काढणीसाठी आलेली केळी बागा उद्धवस्त झाल्याने शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. हिवरखेड येथील शेतकरी विनोद रेखाते यांची शेती दानापूर येथून जवळच असलेल्या सोगोडा येथील शेतकरी सुभाष हागे व डिगांबर हागे यांनी शेती लागवड पद्धतीने केली आहे. आधीच लॉकडाउन व बाजार बंद असल्याने या काढणीसाठी आलेली केळी कोणतेचं व्यापारी उचलण्यास तयार नाही. त्यात भाव मातीमोल व आता हे आस्मानी संकट आल्याने या शेतकऱ्याने लागवडीने केलेल्या शेताचा लागवड खर्चही निघणार की, नाही यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.


क्लिक करा- काय म्हणता, चक्क सावली होणार गायब

माहिती वरिष्ठांना दिली
मंगळवारी (ता.28) दुपारी झालेल्या जोरदार वाऱ्याने काढणीसाठी आलेल्या केळी पिकांची पाहणी केली असता, शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे.
-संजय साळवे, तलाठी, दानापूर

पिकांना भावही नाही
लाखो रुपये खर्ची करून केळीच्या बागांची निर्मिती केली. लॉकडाउनमुळे केळीच्या पिकाला भाव नाही. त्यात झालेल्या जोरदार वाऱ्याने केळी पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघेल की, नाही याबाबत साशंक आहे.
-विनोद रेखाते, केळी उत्पादक शेतकरी, हिवरखेड

loading image