Bhandara : जिल्ह्यात पाच दिवस ढगाळ वातावरण; तुरीचे पीक कीडग्रस्त होण्याची भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पाच दिवस ढगाळ वातावरण; तुरीचे पीक कीडग्रस्त होण्याची भिती

जिल्ह्यात पाच दिवस ढगाळ वातावरण; तुरीचे पीक कीडग्रस्त होण्याची भिती

sakal_logo
By
अभय भुते

लाखनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील मुख्य असलेले धान पीक कापणी झालेले आहे. मात्र नोव्हेंबर लागताच हवामानात झालेल्या बदलाने जोमात असलेले तुर पीक ढगाळ वातावरणामुळे कीडग्रस्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्हयात पुढील पाच दिवस हे आंशिक ढगाळ ते ढगाळ हवामान राहुन दि. १३ ते १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी हवामान कोरडे राहण्याची तसेच तापमानात व आद्रतेमध्ये तफावत होण्याची अधिक शक्यता आहे.

हेही वाचा: Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

दीर्घ मुदतीच्या अंदाजानुसार, विदर्भात दिनांक १७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान हवामान स्थिती सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र साकोली यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा: राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान

अशी घ्या तूर पिकाची काळजी

ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचे फुलोर झळत असून दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो.तूर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत जिब्रेलिक अ‍ॅसिड (१३.९% क्रियाशील घटक) २५ पी.पी.एम. @ १३.९ ग्रॅम (९०% a.i.) प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील पाच दिवसात भंडारा जिल्हयात आंशिक ढगाळ ते ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्यामुळे शेंगा व फुले पोखरणाऱ्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडू शकते.यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेणे फायद्याचे ठरेल.

मानवी आरोग्यावरही परिणाम

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडी चा जोर वाढला होता तापमान १६ डिग्री से्सिअस पर्यंत कमी झाले होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे अचानकच तापमान वाढले असून यामुळे सर्दी खोकला ताप या आजारांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

loading image
go to top