Bhandara Hospital Fire : इंचार्ज परिचारिकेला जामीन; दोघींचा अर्ज फेटाळला

Bhandara Hospital Fire : इंचार्ज परिचारिकेला जामीन; दोघींचा अर्ज फेटाळला

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे ११ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी (९ जानेवारी) मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील इंचार्ज परिचारिका ज्योती बारसागडेला जामीन तर दोन परिचारिका शुभांगी साठवणे व स्मिता आंबिलडुके यांचा जामीन फेटाळण्यात आला.

भंडारा सामान्य रुग्णालयातील जळीत प्रकरणात दोषी ठरविलेल्या तीन परिचारिकांचा जामीन अर्जावर तब्बल सात महिन्यांनी सुनावणी झाली. मंगळवारी भंडारा जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे यांनी भंडारा सामान्य रुग्णालयात जळीत प्रकरणात इंचार्ज नर्सला जामीन देत इतर दोन परिचारिकांचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भंडारा न्यायालयाने उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ दिल्याने त्यांना सात दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे तूर्तास सात दिवस अटक टळली आहे.

Bhandara Hospital Fire : इंचार्ज परिचारिकेला जामीन; दोघींचा अर्ज फेटाळला
बारावीची परीक्षा पुन्हा घ्या; विद्यार्थिनीची नागपूर खंडपीठात याचिका

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ९ जानेवारी रोजी हे जळीत कांड घडले होते. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. यावेळी सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आउट बोर्ड युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते.

ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील दहा बाळांचा मृत्यू झाला होता. तीन दिवसांनी वाचवलेल्या बाळांपैकी एकाचा मृत्यू झाला होता.

Bhandara Hospital Fire : इंचार्ज परिचारिकेला जामीन; दोघींचा अर्ज फेटाळला
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणातील इंचार्ज परिचारिका आणी दोघींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी भंडारा जिल्हा न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे यांनी इंचार्ज नर्सला जामीन देत इतर दोन परिचारिकांचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com