भांगडिया पितापुत्रांना राजस्थानात अटक; पोलिस शिपायांना मारहाणप्रकरण

Bhangadia father and son arrested in Rajasthan Assault on a police constable
Bhangadia father and son arrested in Rajasthan Assault on a police constable

चंद्रपूर : चिमूरचे आमदार बंटी भांगडिया आणि त्यांचे वडील माजी आमदार मितेश भांगडिया यांच्यासह अन्य तीन लोकांना राजस्थानातील सिकर पोलिसांनी शनिवारी अटक केली. या पाचही जणांवर प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी, पोलिस शिपायांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, आमदार बंटी भांगडिया कुटुंबासह राजस्थान येथे गेलेले आहेत. सालासर येथील बालाजीच्या दर्शनानंतर सिकरमार्गे जैसलमेर येथे जात होते. त्याचदरम्यान सिकर येथे प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस शिपाई गिरधारी लाल व महिला पोलिस शिपाई कमला सिल्वर ज्युबिली मार्गावरील एस. के. महाविद्यालयाजवळ कर्तव्यावर होते. त्याचवेळी प्रतिबंधित क्षेत्रात खासगी बस शिरल्याचे त्यांनी पाहिले. त्या बसला थांबवून चालान कापले. त्याचवेळी बसमधून काही लोक उतरले. त्यांनी गिरधारी लाल आणि कमला यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

याच गदारोळात बंटी भांगडिया यांनी स्वतःची ओळख आमदार अशी करून दिली. जयपूरचे भाजपचे आमदार प्रतापसिंह खाचरियावास यांच्याकडे तक्रार करणार, अशी भांगडिया यांनी दोन्ही पोलिस शिपायांना धमकी दिली. तसेच महिला पोलिस शिपायाला शिवीगाळ केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी शिपाई कमला यांनी एस. के. महाविद्यालयाकडे धाव घेऊन स्वतःची सुटका केली. तोपर्यंत भांगडिया यांनी गिरीधारी लाल यांना जबर मारहाण केली होती.

थोड्याच वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले. आमदार बंटी भांगडियासह माजी आमदार मितेशकुमार भांगडिया, भाऊ श्रीकांत यांच्यासह द्वारका दास तथा यवतमाळ येथील शंकर लाल याला अटक पाचही जणांवर गुन्हा दाखल केला. अटकेनंतर पाचही जणांची वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली.

पोलिस शिपाई गिरधारी लालच्या तक्रारीनुसार खासगी बसचालकाने आपली चूक कबूल केली. चालान कापल्यानंतर बस परत नेण्यासाठी वळवली. मात्र, त्याचवेळी बसमधील लोक बाहेर आले आणि चालान कापण्यावरून दोन्ही पोलिस शिपायांना मारहाण आणि शिवीगाळ केली. यासंदर्भात भांगडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com