मोठा निर्णय : कोरोनाच्या धास्तीने सैलानी यात्रा स्थगित 

Big decision: sailani festival stop by Corona's horror
Big decision: sailani festival stop by Corona's horror

बुलडाणा : चीन पासून निर्माण झालेला  कोरोना व्हायरस सगळीकडे धुमाकूळ घालत असताना या जीवघेण्या व्हायरसच्या भीतीने प्रसिद्ध सैलानी यात्रा स्थगित करावी या निर्णयाप्रत प्रशासन आले आहे. आज (ता. 5) मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत या आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे ही यात्रा रद्द होणार असल्याचे कळते प्राप्त माहितीनुसार आज जिल्हाधिकारी व मुख्य सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये इतर विषया सोबतच कोरोना व्हायरस या विषयावर देखील चर्चा झाली. जगप्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेत देश-विदेशासह संपूर्ण भारतभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सगळीकडे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा स्थगित करावे अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. देश-विदेशातील भाविक याठिकाणी येतात. होळीपासून या यात्रेला सुरुवात होत असते. मात्र चीनमध्ये निर्माण झालेला कोरोना व्हायरस सगळीकडे पसरत असल्याने यात्रेमध्ये येणाऱ्याभाविकांच्या माध्यमातून याचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा रद्द करण्यात का येऊ नये अशा आशयाची चर्चा बैठकीत झाली. यावर मुख्य सचिवांनी यात्रा रद्द करण्याबाबत आदेश दिल्याने ही यात्रा स्थगित झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अधिकृत सूचना काढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com