
बुलडाणा : जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) भरती प्रक्रियेत इतर जिल्ह्यात झालेला गोंधळ पाहता मंगळवारी (ता.3) बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 200 च्या विद्यार्थ्यांनी ठिय्या देत करण्यात येत असलेली भरती प्रक्रिया नव्याने घेण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचा रोष पाहता प्रशासनाच्या वतीने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
क्लिक करा - अकोला-अकोट रस्त्यावर विधानसभेत लक्षवेधी
दोषींवर कारवाईची केली मागणी
जिल्ह्यात समुदाय आरोग्य अधिकारी पदसंख्या जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण करण्यात यावी व कोणत्याही परिस्थिती जिल्ह्यातील पदसंख्या कमी करण्यात येऊ नये, इतर जिल्ह्यातील 11 नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात तसेच भरती प्रक्रियेत झालेला गोंधळ दूर करावा व योग्य, पात्र उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणींवर जोर देण्यात आला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित यंत्रणेवर भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार करून पैसे लाटल्याचा थेट आरोप करीत दोषींवर कार्यवाहीची मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पारदर्शकपणे आणि शिस्तीत भरती प्रक्रिया राबविली गेली असल्याचा निर्वाळा केला. 13 व 14 फेब्रुवारीला सीएचओ भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. पात्र, उमेदवारांची मेरीटप्रमाणे यादी निश्चित होऊन त्यांचे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणानंतर पुन्हा परीक्षा होऊन मेरीटनुसार संबंधित उमेदवाराला सीएचओ म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. बीएएमएस, बीयूएमएस, बी.एसस्सी, नर्सिंग अशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्यांसाठी ही भरती होती.
हेही वाचा- अकोल्यात निर्माणनाधिन इमारतीवर चालला हातोडा
‘खास’ उमेदवारांची करण्यात आली निवड
23 जिल्ह्यात समुपदेशन प्रक्रियेव्दारे समुदाय आरोग्य अधिकारी पदाची भरती केली जाणार असून, यासाठी 13 हजार आरोग्यवर्धिनी केंद्र शासन 2022 करणार आहे. गेल्या 29 फेब्रुवारीला समुपदेशन प्रक्रियेची दुसरी फेरी नागपूर येथे झाली. आता तिसरी फेरी पुणे येथे होणार आहे. पहिल्या फेरीत काही ठिकाणाहून भरतीमध्ये गैरप्रकाराचे आरोप करण्यात आले. बुलडाणा येथे सुरुवातीला 226 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, ऐनवेळेवर जागा कमी करून केवळ 169 जागांसाठीच सदर भरती असल्याचे जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या प्रक्रियेनंतर संध्याकाळी अचानक 15 टक्के जागा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही उमेदवारांना दुपारी ध्वनिक्षेपकावरून घरी जाण्याचे सांगण्यात येऊन अनुपस्थित उमेदवाराच्या जागेवर खास उमदेवाराची निवड करण्यात आली. वर्गवारीबाबत घोळ असून, गुणतालिकेतही घोटाळा केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
उपसंचालकांनी दिले होते आश्वसन
जास्त गुणधारकाला डावलून कमी गुणधारकाला नियुक्ती देण्यात आल्याचेही काही उमेदवारांनी सांगितले. त्यातच वाशीम जिल्ह्यातील 11 उमेदवारांना बुलडाण्यात घेतल्यामुळे जिल्ह्यातील उमेदवार हक्कापासून वंचित राहणार असल्याची वेळ आली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 200 च्यावर उमेदवारांनी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा परिषदेत एकत्र आले. नागपूर येथे दुसऱ्या फेरीच्या वेळी अकोला आरोग्य उपसंचालकांनी 2 मार्चला बुलडाणा येथे स्वत: पाहून शंका निरसन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते न आल्यामुळे उमेदवरांनी संताप व्यक्त केला. भरती प्रक्रियेतील शंका उपस्थित करून त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्याकडे स्पष्टीकरण मांगितले. डॉ. कांबळे यांनी यावेळी उत्तर देण्याचा प्रयत्न करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली असल्याचे सांगितले.
विनोद वाघ कडाडले
भरती प्रक्रियेतील गोंधळ सुरू असताना माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुढे यांनी उमेदवारांची बाजू लावून धरली. डॉ. कांबळे यांच्यावर भरती प्रकियेत गोंधळ झाल्याचा तसेच ती नीट न राबविण्याचा आरोप केला. यावेळी माजी जि.प. सदस्य विनोद वाघ यांनी डॉ. कांबळे यांच्या दालनात प्रवेश करत चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांना संपर्क करत कांबळेंची तक्रार केली. भरती प्रक्रियेतील गोंधळ दूर करता येत नसेल तर ज्या जागा कमी केल्या त्या वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.