सावधान! विदर्भात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; यवतमाळमधील आर्णीत १० किलोमीटरचा 'अ‍ॅलर्ट झोन’ घोषित

Bird Flu enters in Yavatmal district in Vidarbha region
Bird Flu enters in Yavatmal district in Vidarbha region

यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणार्‍या जिल्ह्यात आता ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाने शिरकाव केला आहे. आर्णी येथील आठ मोरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दहा किलोमीटरचा जंगल परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिघातून बर्ड बाहेर जावू न देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

राज्यातील तीन जिल्ह्यांत मरण पावलेल्या पक्षांचा एच 1, एन 1 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता.12) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन यंत्रणाही सज्ज झाली आहे. 

कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता ‘बर्ड फ्ल्यू’चा धोका निर्माण झाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांत मागील काही दिवसांपासून ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव वाढत आहे. पाहता पाहता ‘बर्ड फ्ल्यू’ने यवतमाळ जिल्ह्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. 

पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या दोनशे कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला आहे. आर्णी तालुक्यात आठ मोर दगावले असून, यवतमाळ शहरात पक्षी मरून पडल्याची घटना घडली. या घटनेतील सर्व नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथे पाठविले होते. आर्णी येथील मोरांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. सर्व नमुने पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. वनक्षेत्र असल्याने नागरिकांना यापासून धोका नाही. 

सावधगिरी म्हणून दहा किलोमीटरचा परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात 17 पथके तयार करण्यात आलेली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर एक व एक पथक जिल्हास्तरावर असणार आहे. ‘रॅपिड रिपॉन्स टीम’ म्हणून पथके कार्यरत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. आर्णी येथील आठ मोरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. या ठिकाणी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. उर्वरित अहवाल एकदोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.
- डॉ. बलदेव रामटेके, 
उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com