आघाडी सरकार काय म्हणते, शेतकऱ्यांना कर्ज नाही म्हणते 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

नागपूर : हिवाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या मुद्‌द्‌यावरून चांगलाच गाजत आहे. यामुळे दोन दिवस कामकाज होऊ शकले नाही. तसेच विरोधी पक्षाने आंदोलने केली. चौथ्या दिवशीही चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. "आघाडी सरकार काय म्हणते, शेतकऱ्यांना कर्ज नाही म्हणते' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

नागपूर : हिवाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या मुद्‌द्‌यावरून चांगलाच गाजत आहे. यामुळे दोन दिवस कामकाज होऊ शकले नाही. तसेच विरोधी पक्षाने आंदोलने केली. चौथ्या दिवशीही चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. "आघाडी सरकार काय म्हणते, शेतकऱ्यांना कर्ज नाही म्हणते' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली होती. दुसऱ्या दिवशी भाजपने शेतकरी मुद्दा धरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. यासाठी परिसरात आंदोनही केले होते. 

विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन करीत होते. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा - पवार साहेब, फडणवीसांचे सरकार घालविल्याबद्दल अभिनंदन

दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली होती. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली. एकंदरीत शेतकरी मुद्‌द्‌यावरून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. 

क्लिक करा - सोशल मीडिया बंदी कायदा रोखणार : शरद पवार

विरोधक न्याय देण्यासाठी आग्रही

चौथ्या दिवशीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पुन्हा विरोधकांकडून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले. विरोधकांचे आंदोलन सुरू असल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते आग्रही असल्याचे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP again agitation for farmers