ऊर्जामंत्र्यांना का दाखविले भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे? 

चेतन देशमुख 
Sunday, 1 November 2020

महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसने सर्वत्र गाव तेथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. शनिवारी, ३१ ऑक्‍टोबरला गावागावांत मशाल आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथेदेखील मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

यवतमाळ : सप्टेंबरच्या शेवटीशेवटी आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आल्या परतीच्या पावसाने सोयाबीन व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसील चौकात काँग्रेसचे नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काळे झेंडे दाखविले.

अमरावतीच्या ऋतुजा जाधवची `अॅस्ट्राझेनिका` भरारी; झाले जीवनाचे सार्थक

महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसने सर्वत्र गाव तेथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. शनिवारी, ३१ ऑक्‍टोबरला गावागावांत मशाल आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथेदेखील मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत असताना येथील तहसील चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखविले.

यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणे भोवले; कृषी पर्यवेक्षक निलंबित
 

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करीत कॉंग्रेसच्या नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखविण्यात आलेत. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया शेरे, भाजयुमो, महिला आघाडी व शहर भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers show black flags to the energy minister In Yavatmal