esakal | खासगी बाजार समित्या अशा करताय आदेशाची अवहेलना
sakal

बोलून बातमी शोधा

khasagi bajar samiti.jpg

जगासमोर उभ्या असलेल्या संकटाने भातरत प्रवेश करून महाराष्ट्राचाही उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडीबाजार, खासगी व शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्या, हॉटेल, बार रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, शहरातील काही खासगी बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारून शुक्रवारी (ता. 20) रोजी शेतमालाची खरेदी व्यवहार केले. 

खासगी बाजार समित्या अशा करताय आदेशाची अवहेलना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : संपूर्ण देश कोरोना सारख्या विषाणूशी झुंज देत असताना येथील काही व्यापारी मात्र, नफाखोरीच्या लालसेपोटी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून बिनबोभाट खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी येथील बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांनी आपल्या अडेलतट्टू धोरणाचा परिचय देत खासगी बाजार समितीमधील व्यवहार सुरूच ठेवले असल्याचे दिसून येत आहे.

क्लिक करा- रिकाम्यांना येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतला हा निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
सद्यःस्थितीत कोरोना आजाराने उच्छाद मांडला असून, दरदिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगासमोर उभ्या असलेल्या संकटाने भातरत प्रवेश करून महाराष्ट्राचाही उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडीबाजार, खासगी व शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्या, हॉटेल, बार रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, शहरातील काही खासगी बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारून शुक्रवारी (ता. 20) रोजी शेतमालाची खरेदी व्यवहार केले. 

हेही वाचा- अबब...! रेती माफियांनी केला चक्क पोलिसांना चिरडून करण्याचा प्रयत्न

व्यापाऱ्यांंवर कारवाईची मागणी
प्रशासनाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या मार्केटच्या संचालकांविरुद्ध कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शासन प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. या आजाराचा प्रसार गर्दीच्या ठिकाणाहून झपाट्याने होत असल्याने जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तत्परतेने सर्वप्रथम जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली. शिवाय नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्यासोबतच गर्दी टाळ्याचे आवाहन केले. परंतु, नागरिकांकडून या आवाहनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी आठवडीबाजार, खासगी व शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पालन केले. मात्र, शहरातील काही खासगी बाजार समितीच्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून बाजार समितीत सकाळपासूनच शेतकऱ्यांची रेलचेल दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना माल खरेदीचे व्यवहार बेजबाबदारपणे सुरूच ठेवले. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

loading image