esakal | मेहुण्याला वाचवायला गेला अन् विहिरीत बुडून मेला
sakal

बोलून बातमी शोधा

मेहुण्याला वाचवायला गेला अन् विहिरीत बुडून मेला

मेहुण्याला वाचवायला गेला अन् विहिरीत बुडून मेला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचविण्यासाठी रामदास केवटे महाराज या युवकाने पोहणे येत नसताना विहिरीत उडी मारली. मेहुण्याला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र, रामदास विहिरीतील गाळात अडकून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पुसद लगतच्या पार्डी गावात बुधवारी (ता. १) रात्री आठ वाजता घडली. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत रामदास बळीराम केवटे (वय ३२) हा पार्डी येथील चिमा देवी संस्थानमध्ये महाराज म्हणून राहत होता. त्याचा मेहुणा विकास साहेबराव खंदारे (रा. लोहरा) हा त्याच्याकडे बुधवारी पाहुणा म्हणून आला होता. मनोरुग्ण असल्याने त्याने मंदिरालगतच्या खोल विहिरीत उडी घेतली. हे पाहून रामदास महाराज स्वतःला पोहणे येत नसताना विहिरीत झोकून दिले.

हेही वाचा: चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण

अंधार गुडूप असल्याने मेहुण्याला काढणे अशक्य होते. त्यातच रामदास गाळात अडकल्याने वर येऊ शकला नाही. दरम्यान, आरडाओरड झाल्याने गावकरी जमले व त्यांनी महत्प्रयासाने मेहुण्याला बाहेर काढले. नंतर गावकऱ्यांनी विहिरीत गळ टाकून रामदासला बाहेर काढले. तोपर्यंत सारे संपले होते. गुरुवारी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

loading image
go to top