esakal | Video : नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना आला पाण्याचा लोंढा आणि मृतदेह घेऊन गेला, चोवीस तासांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

The body was found washed away in the river

16 जूनला सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. मालेकर यांच्या शेताजवळ दुपारी चार वाजताच्या सुमारास बेलेकर यांचा मृतदेह आढळून आला. नदी पत्रातून मृतदेह बाहेर काढून शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. 15 जूनला मारेगाव परिसरात संततधार पाऊस झाल्याने नाले तुडुंब भरले होते आणि यामुळेच निर्गुडेला पूर आला. 

Video : नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना आला पाण्याचा लोंढा आणि मृतदेह घेऊन गेला, चोवीस तासांनी...

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पळसोनी येथील रहिवासी सीताराम बेलेकर (59) यांचे निधन झाले. प्रथेनुसार नदीपात्रालगत अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. जिल्ह्यात पाऊस बरसला, परंतु दमदार नसल्याने पाणी जमिनीतच मुरले. त्यामुळे नदी प्रवाहित झाली नव्हती. पात्रातच सरण रचण्यात आले. सायंकाळची वेळ असल्याने साऱ्यांची लगबग सुरू होती. सरण रचले, मृतदेह चितेवर ठेवला पुन्हा काही लाकडे ठेवली. विधी पार पडले तितक्‍यात पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि मृतदेह पाण्यासह नदीत वाहून गेला. तब्बल 24 तासांनी बेलेकर यांच्या मृतदेह सापडला. 

प्राप्त माहितीनुसार, मृत सीताराम बेलेकर हे कुंभारखणी येथील खुल्या कोळसा खाणीत कार्यरत होते. रात्रपाळीत काम करून ते दुचाकीने पळसोनी येथे येण्यास निघाले. 15 जून रोजी सकाळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व सोपस्कार आटपून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला.

असे का घडले? - रेल्वेच्या बोगद्याखाली घातक शस्त्रांसह होते बसून; मग सुरू झाला 'खेळ'

कोरोना विषाणुमुळे अंत्यविधीला मोचक्‍याच लोकांना उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासनाचे असल्याने लवकरात लवकर अंत्यविधी करण्याची तयारी सुरू झाली. गावालगतच निर्गुडा नदी आहे. नदीचे पात्र कोरडे असल्याने गावकऱ्यांनी नदी पात्रात अंत्यविधी करण्यासाठी सरण रचले होते. विधी पूर्ण करून मृतदेहाला अग्नी देण्यात आली. मृतदेह जळत असतानाच नदीत पाणी वाहायला सुरुवात झाली. 

पाहता पाहता नदीला पूर आला. पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने जळत असलेला मृतदेह सरणासोबत नदीत वाहून गेला. यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली. उपस्थितांनी मृतदेह पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. रात्रीच गावकऱ्यांनी नदी पात्रात मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र, यश आले नाही.

सविस्तर वाचा -  50 वर्षीय महिलेवर जडले 20 वर्षीय युवकाचे प्रेम, पहाटे घरात घुसून केली ही मागणी...

16 जूनला सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. मालेकर यांच्या शेताजवळ दुपारी चार वाजताच्या सुमारास बेलेकर यांचा मृतदेह आढळून आला. नदी पत्रातून मृतदेह बाहेर काढून शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. 15 जूनला मारेगाव परिसरात संततधार पाऊस झाल्याने नाले तुडुंब भरले होते आणि यामुळेच निर्गुडेला पूर आला. 

अचानक आला पूर

विदर्भात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र, पाहिजे तसा पाऊस अद्याप पडलेला नाही. तसेच उन्हामुळे नदीही आटली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी सीताराम बेलेकर यांच्यावर नदीपात्रालगत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सायंकाळची वेळ असल्याने साऱ्यांची लगबग सुरू होती. सरण रचले, मृतदेह चितेवर ठेवला पुन्हा काही लाकडे ठेवली. विधी पार पडले तितक्‍यात पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि मृतदेह पाण्यासह नदीत वाहून गेला. अंत्यसंस्कार सुरू असतानाच निर्गुडा नदीला अचानक पूर आल्याने हा प्रकार घडला.

जागेअभावी अडकली स्मशानभूमी

पळसोनी हे गाव निर्गुडा नदीच्या तिरावर बसले आहे. गावाची लोकसंख्या 2,500च्या जवळपास आहे. गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार केले जाते. या गावाला स्मशानभूमीचे शेड उपलब्ध नाही. त्यामुळे गावकऱ्यांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे. गावकऱ्यांनी अनेकदा स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी सरकारकडे केली. मात्र, अजूनपर्यंत स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली नाही. त्यामुळे स्मशानभूमीचे काम रखडले आहे. ही मोठी शोकांकिता आहे.