शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा दोघांचा दावा; मनसे कार्यकर्ते संभ्रमात  | Buldhana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns
शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा दोघांचा दावा; मनसे कार्यकर्ते संभ्रमात  

शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा दोघांचा दावा; मनसे कार्यकर्ते संभ्रमात  

देऊळगाव राजा : मनसे शहराध्यक्ष पदावर निवड झाल्याचा दावा दोघांनी केला असून स्थानिक बसस्थानक चौकात दोघांचे शुभेच्छा बॅनर झडकल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत पडले आहे दरम्यान नेमकं अधिकृत शहर अध्यक्ष कोण याबाबत जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी वेगवेगळ्या दोन व्यक्तींची नावे जाहीर केल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच विसंगती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: १ फेब्रुवारीपासून गजबजणार शाळा महाविद्यालये; लसवंतांनाच प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद-विवादाचा मोठा इतिहास आहे यापूर्वी तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून अनेकदा वादंग झाले असून वरिष्ठांकडून यापूर्वी ही नियुक्तीपत्र आणून मीच अधिकृत पदाधिकारी असल्याचे दावे करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर अंतर्गत लाथाळ्या विकोपाला जाऊन अनेकदा अगदी मनसे राडा झाल्याचा अनुभव शहरवासींनी अनुभला, नुकतेच पक्षांतर्गत नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्ष पदावर अधिकृतपणे निवड झाल्याचा दावा दोघांनी केला आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालये बुधवार पासून गजबजणार

दरम्यान तत्कालीन शहराध्यक्ष शेख कदीर यांची शहराध्यक्षपदी फेर निवड झाल्या बद्दलचे शुभेच्छा फलक त्यांच्या समर्थकांनी बसस्थानक चौकात लावले असता काही तासातच बंडू डोळस यांच्या समर्थक असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षपदी श्री डोळस यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लावले असल्याने एकीकडे मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले तर सर्वसामान्य नागरिकही एकाच पदावर दोन व्यक्तीची निवड कशी काय झाली म्हणून बुचकळ्यात पडले आहे.

शहराध्यक्षपदी दोन व्यक्तींची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लागले खरे पण यातील अधिकृत शहराध्यक्ष कोण हा प्रश्न उभा राहिला आहे,पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्यातील मनसेत नेहमीच पदांचा घोळ कायम राहिल्याने पक्ष विस्तारीकरणावर विपरीत परिणाम पहावयास मिळत असून शहराध्यक्ष पदावर निवड झाल्याचा दावा दोन पदाधिकाऱ्यांनी केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Pimpri : शहरातील महाविद्यालये मंगळवारपासून गजबजणार

मनसेचे (MNS)ज्येष्ठ नेते विठ्ठलभाऊ लोखंडकर यांनी शेख कदीर शेख चांद यांची शहराध्यक्ष पदावर फेर निवड केल्याने ते अधिकृत शहराध्यक्ष असल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख यांनी केला .जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्याशी संपर्क केला असता मनसेचे अधिकृत शहराध्यक्ष बंडू डोळस यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या दोन दिवसात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना दिली आहे.

Web Title: Both Claim To Have Been Elected Mayor Mns Activists In Confusion Deulgaon Raja Buldhana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top