क्या बात है! प्रदूषणाविना होणार वीजनिर्मिती; यवतमाळच्या रितिकला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पेटंट

क्या बात है! प्रदूषणाविना होणार वीजनिर्मिती; यवतमाळच्या रितिकला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पेटंट

यवतमाळ : प्रदूषणाविना (Pollution) वीजनिर्मिती (Electrical Generation) अशक्‍य वाटणारी गोष्ट यवतमाळच्या (Yavatmal) सुपुत्राने अवघ्या २०व्या वर्षी करून दाखविली आहे. राष्ट्रीय (National Level) व आंतरराष्ट्रीय पेटंट (International patent) मिळविण्याच्या यादीत रितिक आनंद अमरावत या यवतमाळच्या पुत्राचे नाव नोंदविले गेले आहे. (Boy from yavatmal got International patent)

क्या बात है! प्रदूषणाविना होणार वीजनिर्मिती; यवतमाळच्या रितिकला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पेटंट
कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

रितिक अवघ्या २० वर्षांचा असून, त्याने प्रदूषण न होता वीजनिर्मिती करता येते, ही गोष्ट प्रयोगातून शक्‍य करून दाखविली आहे. त्याच्या प्रोजेक्‍टचे नाव ‘को-जनरेशन पॉवर प्लांट’ असे आहे. त्याने सोलर पॉवर स्ट्रीम व ऍसिटिलीन गॅसपासून वीजनिर्मिती करून दाखविली आहे. ही वीजनिर्मिती करताना कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हीच बाब या प्रयोगाच्या जमेची बाजू आहे.

याप्रमाणे वीजनिर्मितीचे पेटंट भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांत झालेले आहे. अशाप्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट घेणारा सर्वात कमी वयाचा युवक ठरला आहे. या पेटेंटसाठी काही लाखांचा खर्च होणार होता. पण परिस्थिती सामान्य असल्यामुळे इतकी रक्कम कोठून आणावी, हा मोठा प्रश्‍न त्याच्यासोर उभा राहिला. तरी त्याने हिंमत सोडली नाही.

त्याने उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा यांना याबाबत मदत करण्याची विनंती केली. ते त्याला आमदार मदन येरावार यांच्याकडे घेऊन गेले. आमदार येरावार यांनी मदतीचा हात पुढे केल्याने रितिकला पेटंट मिळू शकले. या प्रकल्पासाठी वैज्ञानिक अजिंक्‍य कोट्टावारचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे त्याला अमरावती विद्यापीठाचे डॉ. राजेशकुमार सांभे यांनीसुद्घा मार्गदर्शन केले आहे.

क्या बात है! प्रदूषणाविना होणार वीजनिर्मिती; यवतमाळच्या रितिकला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पेटंट
शटर बंद खरेदी चालूच! आलिशानच्या दुकानात आढळले तब्बल पावणे दोनशे ग्राहक
‘को-जनरेशन पॉवर प्लांट’ला वर्किंग मॉडेल बनवून तयार केले आहे. या मॉडेलमधून प्रदूषण न होता कमी पैशात वीजनिर्मिती करता येते.
- रितिक अमरावत, यवतमाळ.

(Boy from yavatmal got International patent)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com