esakal | जीवघेणी परंपरा : लोकांच्या गोंगाटात एकमेकांच्या अंगावर फोडतात फटाके; गाई, म्हशीच्या खेळाला ‘ब्रेक’
sakal

बोलून बातमी शोधा

A break this year for the cow and buffalo game at Tiwasa

तिवसा शहरातील जीवघेणी परंपरा बंद व्हावी ही मागणी गावातील ज्येष्ठ नागरिकांची असून ही मागणी आजही प्रलंबित आहे. मात्र, यावर्षी या परंपरेला खंड पडल्याने काहींनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. तिवसा पोलिसांचा घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने अनेकांची हौस अपूर्ण राहिली.

जीवघेणी परंपरा : लोकांच्या गोंगाटात एकमेकांच्या अंगावर फोडतात फटाके; गाई, म्हशीच्या खेळाला ‘ब्रेक’

sakal_logo
By
प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शहरातील जुन्या नगरपंचायत कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गाई, म्हशी खेळण्याच्या परंपरेला यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. नगरपंचायत कार्यालयासमोरच असलेल्या वडाच्या झाडाखाली मकाजी बुवा याची पूजा करून शेतकऱ्यांनी ही दिवाळी शांतते साजरी केली. याठिकाणी कुणीही गर्दी करू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी तिवसा पोलिसांचा जुन्या नगरपंचायत कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त होता.

शहरातील जुन्या नगरपंचायतीसमोर मकाजी बुवाचे लहान देवस्थान आहे. याची पूजा करून या प्रांगणात गावातील लोक आपले म्हशी, हेले, गाई आणत असतात. त्यांना खेडवत असतात. हा सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिक येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे कुठेही गर्दी करता येत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या या परंपरेला खंड पडला आहे. काही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळाला.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

लोकांच्या गोंगाटात एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा आहे. फटाके फोडण्यासाठी आलेले तरुण जखमी सुद्धा होतात. घटनास्थळी काही काळ तणावसुद्धा निर्माण होतो.

तिवसा शहरातील जीवघेणी परंपरा बंद व्हावी ही मागणी गावातील ज्येष्ठ नागरिकांची असून ही मागणी आजही प्रलंबित आहे. मात्र, यावर्षी या परंपरेला खंड पडल्याने काहींनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. तिवसा पोलिसांचा घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने अनेकांची हौस अपूर्ण राहिली.

सविस्तर वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

आता कायम हा खेळ बंद व्हावा

जनावरांना खेळवणे व त्यांची स्पर्धा भरवने तसेच त्यांना निर्दयपणे वागणूक देणे यावर कायद्याने बंदी असली तरी तिवसा शहरात हा खेळ काही हौशी लोक भरवतात. यावेळी कोरोनाच्या नियमाची पायमल्ली होऊ नये या दृष्टीकोनातून पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुणीही याठिकाणी कसले कृत केले नाही. मात्र, हा जीवघेणा खेळ कायमचा बंद व्हावा अशी मागणी आजही ज्येष्ठ व वन्यप्राणीप्रेमींकडून होते.

संपादन - नीलेश डाखोरे