चिंताजनक : विदर्भातील या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 21 वर

corona positive.jpg
corona positive.jpg

बुलडाणा : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आणखी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज (ता. 14)  दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. या चार नव्या रुग्णांपैकी तीन मलकापूर येथील तर एक रुग्ण बुलडाण्यातील आहे.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ही माहिती जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत दिली आहे. तीन दिवसांपासून 17 वर थांबलेली संख्या 4 ने वाढली. यात एक बुलडाण्याचा तर 3 मलकापूरचे कोरोना संसर्गीत आहे. गेल्या 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते. ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकूण स्वॅबपैकी  नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकपूरच्या कोरोना रुग्णाला तपासणारे डॉक्टरसुद्धा निगेटीव्ह आले. परंतु संबंधीत कोरोना संसर्गीताच्या कुटुंबातील तीन जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती आहे. 

तर बुलडाणा शहरात कोरोना संसर्गीताची एकाने वाढ झाली आहे. संबंधीत नवीन कोरोना रुग्ण हा त्याच भागातील असून त्याचे दिल्ली कनेक्शन असल्याचे कळते. त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ही संख्या वाढल्यामुळे बुलडाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापूरसाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकूण चार रुग्ण झाले आहेत. आता बुलडाणा एकूण 6 (एक मृत), मलकापूर 4, शेगांव 3, चिखली 3, खामगाव (चितोडा) 2, देऊळगांवराजा 2 आणि सिंदखेडराजा एक, असे एकूण 21 जण कोरोना बाधित संसर्गीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com