Khamgaon News : मोबाईलवर बंदी असतानाही मतदान करतानाचे फोटो व्हायरल

मतदान केंद्रावर मोबाईलबंदी फक्त कागदावरच? खामगाव मतदार संघातील प्रकार.
Buldhana Loksabha Election
Buldhana Loksabha Electionsakal

खामगाव - बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी (ता.२६) मतदान पार पडले. मतदानादरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे. मात्र खामगाव विधानसभा मतदार संघातील अनेक केंद्रावर मतदान करतानाचे फोटो व व्हिडीओ काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तर हौशी मतदारांनी एवढ्यावरच न थांबता सोशल मिडियावर व्हायरल सुध्दा केले आहेत. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघात मतदान झाले. त्यामध्ये बुलडाणा मतदार संघाचा देखील समावेश आहे. मतदानादरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे.

असे असतानादेखील खामगाव शहरात काही अतिउत्साही व हौशी मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यात त्यांनी कोणत्या उमेदवाराला मतदान केलं हे देखील स्पष्ट दिसतं आहे. त्यांच्या या कृतीमुळे गुप्त मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

असे असूनही काही लोकांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मतदान करतानाचे फोटो काढून हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

केंद्राच्या आवारात कार्यकर्त्यांचा जथ्था

मतदार संघातील एकाही केंद्रावर मतदारांची तपासणी करण्यात आली नाही. तर अनेक मतदान केंद्राच्या आवारात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जथ्था दिसून आला. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कार्यकर्त्यांकडून आपआपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत सांगून प्रचार करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांना हटकण्यात आले नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर सुध्दा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com