‘त्या’अधिग्रहित जमिनीवर चालला बुलडोझर अन् 16 कुटुंब आले उघड्यावर
शेगाव (जि. बुलडाणा) : विकास आराखड्यांतर्गत वाहन पार्किंगकरिता अधिग्रहित केलेल्या खळवाडी परिसरातील जमिनीवरची घरे बुधवारी (ता.4) सकाळी आठ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या कडक बंदोबस्तात बुलडोझरच्या साहाय्याने जमिनदोस्त करण्यात आली. अगदी सकाळच्या सुमारास झालेल्या या हृदय हेलावणाऱ्या कारवाईने एकच हाहाकार उडाला. या कारवाईत एकूण 16 कुटुंब उघड्यावर आले.
जमिनीचा मोबलाही मिळाला होता
कायदेशीर बाब असल्यामुळे कोणालाही ही कारवाई थांबविण्यासाठी काहीही करता आले नाही. न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली असून, सदरहू नागरिकांना घरे खाली करण्याकरिता तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही त्यांनी घरे खाली केली नसल्याने नाईलाजास्तव ही कारवाई करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. खळवाडी परिसरातील 23 खासगी मालमत्ताधारकांना त्यांच्या अधिग्रहित जमिनीचा शासनाकडून मोबदला देण्यात आला आहे. त्यापैकी काहिंनी मोबदला घेतला तर इतरांची मोबदल्याची रक्कम आयुक्त कार्यालयात जमा आहे. एकूण 23 पैकी सात नागरिकांनी घरे खाली करून दिली होती.
हेही वाचा - या अभिनेत्री विरुद्ध अकोला पोलिसांत तक्रार
नगरपरिषदेचे आहेत कर्मचारी
16 मालमत्ताधारकांना वारंवार सूचना व लेखी नोटीसा देवून सुध्दा त्यांच्याकडून घरे खाली करण्यात येत नव्हती. न्यायायलाकडून तीनदा मुदतवाढ दिल्यानंतरही संबंधितांकडून घरे खाली करून दिल्या जात नसल्याने बुधवारी नाईलाजास्तव शासनाकडून अधिग्रहित घरे खाली करण्याची कार्यवाही करण्यात आली. असल्याचेही शेळके यांनी सांगितले. पोलिस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कार्यवाहीत जेसीबीच्या साहाय्याने 16 घरे पाडण्यात आली. विशेष म्हणजे या 16 कुटुंबातील बहुतांश सदस्य नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. घटनेनंतर दुपारच्या सुमारास या सर्व कुटुंबियांनी आपल्या पोराबाळासह न.प. कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. मात्र, यातील काही संतप्त झालेल्यांनी नगर परिषद कार्यालयात तोडफोड केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करून त्या सर्वांना न.प.कार्यालयाच्या आवारातून हुसकावून लावले.
15 फेब्रुवारी होती शेवटी तारीख
सदरहू 16 मालमत्ताधारकांना न्यायालयाकडून तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ 15 फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र, त्यानंतरही या मालमत्ताधारकांकडून न्यायालयाच्या आदेशाची तालीम केल्या जात नव्हती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेवून वरिष्ठांच्या समंतीने घरे पाडण्याची कारवाई करण्यात आली.
-प्रशांत शेळके, मुख्याधिकारी, नगरपरिषद.
न.प.कार्यालयात झाली तोडफोड
बुधवारी सकाळी खळवाडीत अधिग्रहित जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या 16 घरावर नगर परिषद प्रशासनाचा बुलडोझर चालला. तीनवेळा मुदतवाढ देऊनही संबंधित नागरिक घरे खाली करून देत नसल्याने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. जी 16 घरे पाडली त्यामधील नागरिक आपल्या मुला-बाळासहीत नगरपरिषदच्या पायऱ्यावर धरणे आंदोलन केले. यावेळी काही संतप्त नागरिकांनी कार्यालयात तोडफोड केल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना शेवटी पोलिसांचा सहारा घ्यावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.