Video : महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणतात, आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

जुन्या सत्ताधाऱ्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यामुळे घरी आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका असा सल्लाही त्यांनी मतदारांना दिला. मुख्य म्हणजे विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष या माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील या सभेला उपस्थित होते.

वाशीम : सध्या मी मंत्री पदाची शपथ घेतली आहे, आणखी आमचे खिसे गरम व्हायचे आहेत. मात्र, जे जुने सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यांच्याकडून लक्ष्मी दर्शन करून घ्या, मात्र मतदान आम्हाला काँग्रेसला करा, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कामरगाव (जि.वाशीम) येथील सभेदरम्यान केले.

सध्या राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होऊ घातल्या आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेण्याचा धडाका लावला असून, आज वाशीमच्या कामरगाव येथे प्रचार सभेदरम्यान काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणा दरम्यान, एक धक्कादायक वक्तव्य केलंय. निवडणूक प्रचारादरम्यान मतदाराला आवाहन करताना त्या बोलत होत्या.

 

जुन्या सत्ताधाऱ्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यामुळे घरी आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका असा सल्लाही त्यांनी मतदारांना दिला. मुख्य म्हणजे विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष या माजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील या सभेला उपस्थित होते.

क्लिक करा - महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पुन्हा नागपूरकडे, यांना मिळाले गृहमंत्रिपद

राहुल ब्रिगेडच्या यशोमती ठाकूर
तिवसा मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिकपासून ऍड. आमदार यशोमती ठाकूर निवडून येत आहेत. त्यांना वडील व माजी आमदार कै. भय्यासाहेब ठाकूर यांच्यापासूनच राजकीय वारसा मिळाला. यशोमती ठाकूर यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर सलग तीनदा त्या विजयी झाल्या.

हेही वाचा - मुनगंटीवारांनी राखला चंद्रपूर जि. प.चा गड, भाजपच्या रेखा कारेकार विजयी

कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे पार पाडत इतरही राज्यात यश संपादन करून आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली. कॉंग्रेस पक्षाच्या स्टारप्रचारक म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडली. राहुल ब्रिगेडच्या महत्त्वाच्या पदाधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. मेघालय व कर्नाटक या दोन राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर होती.

 महत्त्वाची बातमी - 24 जानेवारीला न चुकता उपस्थित रहा, देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाचे आदेश

डॅशिंग आमदार
17 मे 1974 रोजी ऍड. यशोमती चंद्रकांत ठाकूर यांचा जन्म अमरावतीतील मोझरी येथे झाला. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागातील जनतेशी सतत संपर्कात राहून यशोमती ठाकूर यांनी वडिलांपासून असलेला राजकीय वारसा सांभाळला आहे. अतिशय अभ्यासू, स्पष्टवक्तया, आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या, सरकार कोणतेही असले तरी विकास खेचून आणणाऱ्या डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cabinet minister yashomati thakur statement at washim