corona virus in washim.jpg
corona virus in washim.jpg

Coronavirus : या जिल्ह्यात शासनाने दिली मुभा; मात्र व्यापाऱ्यांनी घातले हे बंधन

वाशीम : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र वाशीम येथील व्यापारी मंडळाने आपली प्रतिष्ठाने दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रिनझोनमधे असलेला जिल्हा रेडझोनमधे जावू नये यासाठी व्यापारी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात इतरत्र व्यापारी वेळ मर्यादा वाढविण्याची मागणी करीत असताना वाशीम येथील व्यापारी मंडळाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. लाॅकडाऊनच्या शिथिलतेनंतर जिल्हा प्रशासनाने शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र दुपारी दोन वाजेनंतर चौकांमधे असलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांसमोर मोठी गर्दी होत आहे.यामधे सोशल डिस्टलिंग राखले जात नाही. या परिस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो ही बाब लक्षात घेवून व्यापारी मंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंतच व्यापारी प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात सध्या कोरोनाची रूग्णसंख्या आठ नोंदविली गेली आहे. हे सर्व रूग्ण बाहेरचे आहेत. स्थानिक समुह संसर्ग जिल्ह्यात झाला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून येणार्या ची संख्या वाढली आहे. जर व्यापारी प्रतिष्ठाने सायंकाळपर्यंत उघडी राहिली तर सायंकाळी गर्दी वाढून सामुहिक संसर्ग वाढण्याची भिती आहे. त्यामुळे व्यापारी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

दोन वाजेपर्यंतच व्यापारी प्रतिष्ठाने उघडी
गेल्या दोन महिन्यांपासून व्यापार ठप्प आहे. आता प्रशासनाने जिल्ह्यामध्ये व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. ही चांगली गोष्ट आहे मात्र सामुहिक संसर्ग वाढण्याची भीती असल्याने व्यापारी मंडळाने सामाजिक जबाबदारीतून दुपारी दोन वाजेपर्यंतच व्यापारी प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याचे ठरविले आहे.
- जुगलकिशोर कोठारी, अध्यक्ष, व्यापारी मंडळ वाशीम जिल्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com