Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

Chandrapur Mayor : कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स निर्माण झालाय. यातच भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाशी हातमिळवणीसाठी चर्चा केली जात असल्याचं समजतंय.
CM Fadnavis And Uddhav Thackeray

CM Fadnavis And Uddhav Thackeray

Esakal

Updated on

चंद्रपूर महानगरपालिका महापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारीला होणार आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स निर्माण झालाय. शिवसेना ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून जादुई आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव केली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांकडून इतर पक्षांचे आणि अपक्ष नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

CM Fadnavis And Uddhav Thackeray
धक्कादायक! यवतमाळमधील शाळेत पाकिस्तानी लष्कराच्या स्फूर्तीगीताचं गायन, भाजप नेत्यानं दाखल केली तक्रार; VIDEO VIRAL
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com