

Pakistani army song sung in school sparks political outrage
Esakal
यवतमाळच्या उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना पाकिस्तानी सैन्याचा गौरव करणाऱ्या गीतावरील नृत्य सादर करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजप नगरसेवक गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिस आणि मुख्याधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. "ये मर्द-ऐ-मुजाहिद, तेरी ऐल्गार क्या है" हे गीत पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून गायले जाते, धर्मासाठी लढणारा योद्धा असा त्या गीताचा अर्थ आहे.