Wreckage of the ST bus that crashed into a 10-foot ditch near Irai River Bridge in Chandrapur : वरोरा : चिमूरहून प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने. बस थेट इरई नाल्याच्या पुलाजवळील दहा फुट खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात वाहकाचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी झाले. यातील ६ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवार (ता. ५) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सुरेश भटारकर (वय ५५ रा. राजुरा) असे मृत वाहकाचे नाव आहे.