esakal | महालक्षमीच्या प्रदूषणाविरोधात चिमुकल्यांची गांधीगिरी; घोषवाक्‍य लिहिलेले फलक घेऊन केले आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

children are showing posters against pollution of mahalaxmi factory

प्रदूषणाने देवळी शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. तसेच लहान मुलांमध्ये दमा, अस्थमा, त्वचेचे रोग, डोळ्यांचे आजार या सारखे अनेक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

महालक्षमीच्या प्रदूषणाविरोधात चिमुकल्यांची गांधीगिरी; घोषवाक्‍य लिहिलेले फलक घेऊन केले आंदोलन

sakal_logo
By
शेख सत्तार

देवळी (जि. वर्धा) : गत काही दिवसांपासून महालक्ष्मी कंपनी विरोधात प्रदूषण आणि कामगारांच्या मागण्या घेऊन युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोमवारी (ता. 19) चिमुकल्यांनी सहभाग घेत गांधिगरी करीत आंदोलन केले.

प्रदूषणाने देवळी शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. तसेच लहान मुलांमध्ये दमा, अस्थमा, त्वचेचे रोग, डोळ्यांचे आजार या सारखे अनेक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आज सकाळी अचानक महालक्ष्मी टीएमटी कंपनीसमोर प्रदूषणाने त्रस्त असलेल्या चिमुकल्यांनी गांधीगिरी करीत आंदोलन केले. कंपनीच्या गेट समोर सकाळी 10 वाजता देवळीतील 15 ते 20 चिमुकले हातात निषेधार्थ घोषवाक्‍य लिहिलेले फलक घेऊन उभे राहिले.

हेही वाचा - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास  

निषेध फलकावर कंपनी हवी, प्रदूषण नको, "आमच्या हक्काची शुद्ध हवा कुठे हरवली ?", "निदान आमची पिढी तरी प्रदूषणाने उद्‌ध्वस्त करू नका", "आमच्या शुद्ध हवेला प्रदूषित करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" अशा घोषवाक्‍यांनी कंपनी प्रशासन व कामगारांचे लक्ष वेधून घेतले होते. 

कंपनी समोर आंदोलनकारी लहान मुलांना बघून परिसरातील कामगार, कंपनीचे सर्व अधिकारी आश्‍चर्यात पडले. उद्याच्या भारताचे भविष्य असलेले लहान मुलांनी प्रदूषणाविरोधात एल्गार पुकारल्याने गावात सर्वत्र चर्चेला उधाण आले.

ठळक - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

या चिमुकल्यांना काहींनी प्रश्न विचारले असता लहानग्या मुलांनी या प्रदूषणावर फार मार्मिक मते व्यक्त केली. निदान आतातरी कंपनी प्रशासनाचे डोळे उघडतील का ? असा सवाल नागरिकांतून विचारल्या जात आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाने कंपनीवर तातडीने कारवाई करून थेट कंपनीतून सोडण्यात येणारे प्रदूषण थांबविण्याची व चिमणीची उंची वाढवायची मागणी नागरिक करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image