esakal | कोरोनाची समस्या त्यात पाण्याचे चटके; नागरिकांना झाले असह्य आणि उचलले हे पाऊल!
sakal

बोलून बातमी शोधा

morcha.jpg

शहराला न. प. च्यावतीने आठ दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यातच उन्हाळा व कोरोना व्हायरसचा काळ अन् सर्वत्र लॉकडाउनची परिस्थिती असताना तांत्रिक बिघाडामुळे न.प. चा होणारा पाणी पुरवठा तीन-चार दिवस पुढे गेला आहे.

कोरोनाची समस्या त्यात पाण्याचे चटके; नागरिकांना झाले असह्य आणि उचलले हे पाऊल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) : लॉकडाउनच्या काळातही गेली आठ-नऊ दिवसापासून काळीपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याने नागरिक त्रस्त झाले होते. शेवटी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर आंदोलन करून पाण्याची व्यथा नागरिकांना मांडावी लागली. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यास स्थानिक नगरपालिका असमर्थ ठरल्याने अखेर नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या निर्देशावरून न.प. मुख्याधिकारी रमेश ढगे यांना काळीपुरा भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा लागला.

शहराला न. प. च्यावतीने आठ दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यातच उन्हाळा व कोरोना व्हायरसचा काळ अन् सर्वत्र लॉकडाउनची परिस्थिती असताना तांत्रिक बिघाडामुळे न.प. चा होणारा पाणी पुरवठा तीन-चार दिवस पुढे गेला आहे. त्यातच शहरातील सर्व रस्ते प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आल्याने बाहेरून पाणी गाड्या बोलविण्याचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करणे शक्य नाही व नळालाही पाणी येत नाही. अशा संकटात सापडल्याने स्थानिक काळीपुरा भागातील संपप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रावारी (ता.17) सायंकाळी सात वाजता न.प.च्या पाणी पुरवठा विभागावर धडक देत नळाला पाणी देण्याची मागणी केली.

आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'

मात्र, त्याठिकाणी कोणी जबाबदार अधिकारीच हजर नसल्याने दाद मागावी तर कुणाकडे असा प्रश्न आंदोलनकर्त्यांना पडला असता सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख यांनी न.प. मुख्याधिकारी ढगे यांना भ्रमणध्वनीद्वारे पाणी प्रश्‍नाबाबत सांगितले मात्र, त्यांनी नळ येतील असे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केले. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे पाण्याच्या प्रश्‍नाबाबत माहिती विषद केली. त्यावर त्यांनी तत्काळ मुख्याधिकाऱ्यांना काळीपुरा भागाचा व शहराचाही पाणी प्रश्‍न मार्गी लावण्याचे आदेशच दिले. 

त्यानंतर लगेचच रात्री नऊ वाजेच्या दरम्यान काळीपुरा परिसरातील नळाला पाणी सोडण्यात आले. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटविल्या बद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे काळीपुरा परिसरातील नागरिक आभार व्यक्त करीत आहेत. यावेळी राहुल देशमुख, प्रशांत जाधव, निखिल निळे, सुनील वारके, दीपक मंडळकर, निलेश डवले, अक्षय निळे, संदीप जामोदे, नंदकुमार देशमुख, योगेश देशमुख, भूषण शिंदे, अक्षय डवले, संजय निळे, श्रीवास्तव उपस्थित होते.

गेली दहा दिवसात दुसऱ्यांदा मलकापूरच्या पाणी प्रश्‍नावर जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष द्यावे लागल्याची बाब समोर आली आहे. विलगीकरण कक्ष स्त्री रुग्णालयात असताना नगराध्यक्ष अ‍ॅड. रावळांनी गैरसोयीचा व्हिडिओ व्हायरल करीत तेथील रुग्णांना पाणीच उपलब्ध नसल्याचेही प्रकर्षाने दाखविले होते. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष असलेल्या शहराला २४ तास पाणी देतात का? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. शुक्रवारी काळीपुरा भागातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच पाण्यासाठी दाद मागितली असता त्यांना पुन्हा मलकापूरच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत लक्ष द्यावे लागले. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न किती गंभीर असेल याची कल्पना त्यांना आलीच असेल. तेव्हा त्यांनी याबाबत त्यांच्या स्तरावरून हा प्रश्न मार्गी लावावा, अशीही मागणी शहर वासियांमधून होत आहे.

loading image