अरे देवा! नवतपा करणार सर्वांना घामाघूम; काय आहे नवतपा?..जाणून घ्या याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

यंदा कोरोना संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे प्रत्‍येकजण घरात लॉकडाउन झाला असा तरी सूर्य आग ओकत असल्‍याने उकाडा असह्य होत आहे. मधूनमधून पावसाचा शिडकावा होत असला तरी उन्‍हाळा खऱ्या अर्थाने आता तापायला लागला आहे.

खामगाव (जि.बुलडाणा) : सोमवारी (ता.25) सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश होत असून, त्‍याबरोबर नवतपाही सुरू होत आहे. सर्वाधिक तापमानाचे हे नऊ दिवस तीन जूनपर्यंत राहणार आहेत. या दरम्‍यान नागरिकांना घामाघूम होत नवतपाचा ताप सहन करावा लागणार आहे.

यंदा कोरोना संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे प्रत्‍येकजण घरात लॉकडाउन झाला असा तरी सूर्य आग ओकत असल्‍याने उकाडा असह्य होत आहे. मधूनमधून पावसाचा शिडकावा होत असला तरी उन्‍हाळा खऱ्या अर्थाने आता तापायला लागला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. त्‍यातच सोमवार (ता.२५) पासून नवतपाला सुरुवात होत आहे. आधीच पारा 43 ते 45 अंशावर गेला असताना नवतपात काय होणार, याची चिंता लागून राहिली आहे.

हेही वाचा - Video : तुम्हाला माहिती आहे आयपीएल प्लेअर काय करतोय अकोल्यात?, रणजी आणि अंडर 19 चे खेळाडूंचा जाणून घ्या
दिनक्रम

नवतपाच्‍या सोबतच रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होत असून, या नक्षत्राचे वाहन कोल्‍हा आहे. या नक्षत्रात तुरळक पावसाची शक्‍यता असल्‍याचे पंचांग अभ्यास रवि रोठे यांनी सांगितले. संपूर्ण उन्‍हाळ्यात सर्वाधिक तापमान या नवतपात अर्थात या नऊ दिवसांत असते, असे म्‍हटले जाते. खरेतर यंदाचा उन्‍हाळा कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणात कसातरी निघून गेला. 

आवश्यक वाचा - अरे वा! गावाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

ढगाळी वातावरणाने दिलासा दिला असला तरी मागील आठवड्यापासून सूर्य चांगलीच आग ओकत असून, उन्‍हाचे चटके असह्य होत आहेत. परंतु मागील वर्षी झालेल्‍या भरपूर पाऊस झाल्‍यामुळे यावर्षी शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. नाहीतर कोरोनाच्‍या संसर्गजन्‍य आजाराच्‍या कचाट्यात पाणी टंचाईचा मुद्दा उग्र रुप धार करणारा ठरला असता.

काय आहे नवतपा?
ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या गणनेनुसार जेव्‍हा सूर्य रोहिणी नक्षत्रात 15 दिवसांसाठी येतो, त्‍या 15 दिवसापैकी सुरवातीचे नऊ दिवस जास्‍त गर्मीचे असतात. याच सुरुवातीच्‍या नऊ दिवसांना नवतपा म्‍हणतात. खगोलशास्‍त्रानुसार यावेळी सुर्यकिरणे पृथ्वीवर लंबरुप पडत असल्‍याने तापमान वाढते. ज्‍योतिषांच्‍या अनुमानानुसार जर नवतपा पूर्ण नऊ दिवस तापला तर पाऊसही चांगला पडतो. मागील पाच वर्षांपासून नवतपा 25 मे रोजीच प्रारंभ होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens will have to endure the fever of navtapa in buldana district