#NagpurWinterSession : शेतकऱ्यांना दिलेले वचन पाळणार : मुख्यमंत्री (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

विरोधकांनी आमच्यासमोर गळे काढण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घसा मोकळा करावा, असे ठाकरे म्हणाले. महाआघाडी सरकार शेतकऱ्यांचे दु:ख जाणते. त्यामुळे आम्ही दिलेले आश्‍वासन पाळणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

नागपूर : आमचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे. आमच्या रयतेनेच ईथपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील असून, शेतकऱ्यांना दिलेल वचन हे सरकार पाळणार असल्याची स्पष्टोक्‍ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापले होते. दुसऱ्या दिवशी देखील अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी सकाळीच आक्रमक पवित्रा घेत विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात देखील विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

style="font-size:18px;">अवश्य वाचा - #NagpurWinterSession : बच्चू कडू म्हणाले, सरकाने तरी शेतकऱ्यांना मदत करावी

 

विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. आमचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे. आमच्या रयतेनेच आम्हाला ईथपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकाने अद्याप मदत केलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी आमच्यासमोर गळे काढण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घसा मोकळा करावा, असे ठाकरे म्हणाले. महाआघाडी सरकार शेतकऱ्यांचे दु:ख जाणते. त्यामुळे आम्ही दिलेले आश्‍वासन पाळणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

सविस्तर वाचा -  #NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

...तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ आली नसती 

शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामना आम्ही बघत नाही आणि वाचतही नाही, असे म्हणणारे आमचे पूर्वीचे मित्र आणि आजचे विरोधक आज सभागृहात सामना दाखवत होते. त्यांनी सामना नेहमीच मन लावून वाचला असता तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. शेतकरी-शेतकरी म्हणून गेले दोन दिवस सभागृहात गोंधळ घातला जात आहे. हे नुसते नाटक आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाशी मी बांधील आहे, तो माझा आणि शेतकऱ्यांमधला, आम्हा दोघांचा प्रश्‍न आहे. तुम्ही करणारच पण आम्ही करून घेतले असे चित्र ज्यांना निर्माण करायचे आहे किंवा करायला लावले यासाठी विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आला आहे. आम्ही हाताची घडी घालून बसलेलो नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकाने केंद्र सरकारच्या जीवावर हे आश्‍वास दिले होते का? आता केंद्राकडे चेंडू टोलविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवी यांनी केली. 

क्लिक करा - #NagpurWinterSession : आव्हाड म्हणाले, राज्याला भाजपची अपरिपक्वता दिसली

भाजपचे हिंदुत्त्व बुरखाधारी

आम्ही हिंदुत्त्ववादी आहोतच. आम्ही धर्मांतर केलेले नाही. 2014 मध्ये युती तोडली तेव्हाही आम्ही हिंदूच होतो. परंतु, हिदुत्त्वाचा बुरखा घालून कुणी देशाच्या मुळावर घाव करीत असेल तर आमचे हिंदुत्त्व त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपवर तोंडसुख घेतले होते. वीर सावरकर यांच्या अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाबाबत कुणीही बोलत नसल्याचे नमूद करीत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thakrey said we will fulfill our promise given to farmers winter session Nagpur