Congress Leaders Helped BJP?
esakal
चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी शेवटच्या दिवशी नामनिर्देशनपत्र मागे घेत काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनीच भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप केल्यामुळे पक्षाचे नगरसेवक आणि मतदार दूर गेल्याचा दावा त्यांनी केला. अग्रवाल यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.