कंत्राटदार सभापतींचा "खासमखास'; विभागात ढवळाढवळ वाढल्याने कर्मचारी त्रस्त

contractor are special to speaker in amaravti
contractor are special to speaker in amaravti

अमरावती ः जिल्हा परिषदेच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या सभापतींनी चक्क एका सोलर दिव्यांच्या कंत्राटदारालाच आपला खासमखास बनविल्याची माहिती आहे. या व्यक्तीचा वाढता हस्तक्षेप असह्य झाल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे.

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून मेळघाटातील निकृष्ट सौरदिव्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना चक्क एका कंत्राटदारालाच राजकीय अभय देण्यात आल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत आहे. मागील काही महिन्यांत मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्‍यात विविध योजनांतून तब्बल एक ते दीड कोटींचे सौरदिवे लावण्यात आले. 

मात्र त्यातील बहुतांश दिवे बंद पडलेले आहेत. कंत्राटदाराची देयके मात्र काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आमसभेतसुद्धा हा मुद्दा चर्चेला आला होता. मात्र त्यानंतर पुढे काहीच चौकशी केली नाही. विशेष म्हणजे लावण्यात आलेले अनेक सौरदिवे बंद आहेत तर काही गावांमध्ये सौरदिवे न लावताच देयके काढण्यात आल्याच्या सदस्यांच्या तक्रारी आहेत. 

जिल्हा परिषदेला चुना लावणाऱ्या कंत्राटदाराला संबंधित विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत, हे तर जगजाहीर आहे. कंत्राटदारावर कारवाई करणे तर दूरच साधी नोटीससुद्धा देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत एका सोलर कंत्राटदारालाच सभापतींनी स्वीय सहायकाची नोकरी दिली आहे. 

खासगी सचिव असलेली ही व्यक्ती शासकीय सचिवांच्या खुर्चीवर बसून संबंधित विभागाच्या फाइल्स तपासणी करणे, अभ्यागतांच्या भेटीच्या वेळा ठरविणे ही कामे पार पाडू लागली आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीचा कुठलाही संबंध नसतानासुद्धा विभागांतर्गत हस्तक्षेप वाढल्याने कर्मचारी मात्र त्रस्त झाले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com