कचरा प्रश्‍न पेटला; घंटागाडी चालकांचा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

सूरज पाटील 
Thursday, 12 November 2020

यवतमाळ शहरात कचरा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. दिवाळीत हा प्रश्‍न आणखीच पेटला आहे

यवतमाळ : घंटागाडी चालकांचे कंत्राटदाराने मागील तीन महिन्यांचे वेतन थकविले. त्यामुळे चालकांनी कामबंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

क्लिक करा - पितळ पडले उघड; सरकार ४२६ शेतकऱ्यांकडून ३६ लाख रुपये करणार वसूल

यवतमाळ शहरात कचरा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. दिवाळीत हा प्रश्‍न आणखीच पेटला आहे. नगरपालिकेने कंत्राटदाराला शहरातील कचरा संकलन करून कचरा डेपोवर टाकण्याचे कंत्राट दिले आहेत. मात्र, कंत्राटदाराकडून आडमुठेपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. 

घंटागाडीचालकाला किमान वेतनानुसार 17 हजार रुपये, तर 14 हजार 500 रुपये सहायकाला देणे अपेक्षित आहे. तशी नोंद नगरपालिकेच्या करारात आहे. याशिवाय भविष्यनिर्वाह निधीतही रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. कंत्राटदार चालक व सहायकाला कमी वेतन देऊन बोळवण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

कंत्राटदाराने मागील तीन महिन्यांचे वेतन दिले नाही. दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. मात्र, वेतन मिळाले नाही. त्यामुळे घंटागाडीचालकांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगरसेवक राजेंद्र गायकवाड यांनी चालकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यात बादल पेटकर, मोहन भगत, वैभव लोखंडे, उमेश भारती, शैलेश खंडारे, जहीर खान यांच्यासह चालक व सहायकांचा सहभाग होता.

 संपादन - अथर्व महांकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contractor did not gave salaries to garbage vehical drivers