धक्कादायक : मुंबईवरून आलेल्या आठ वर्षीय मुलीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

आठ वर्षे मुलीला किडनीचा आजार असल्यामुळे तिला मागील दोन महिन्यापासून जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी उपचार सुरू होते.

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पांग्रा गावातील एक कुटुंब आठ वर्षीय मुलीचा उपचारासाठी मुंबई या ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून वास्तव्यास होते. 

आठ वर्षे मुलीला किडनीचा आजार असल्यामुळे तिला मागील दोन महिन्यापासून जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आठ वर्षीय मुलीचा कोरोना स्वॅब घेतला होता. परंतु त्याचा रिपोर्ट येणे बाकी होता. त्यामध्ये मुलीच्या कुटुंबाने गावाकडे येण्याचे ठरवले, गावाकडे जात असल्याची कोणतीही पूर्वकल्पना प्रशासनाला व संबंधित जे जे हॉस्पिटलच्या प्रशासनाला देण्यात आली नव्हती. 

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

त्यामुळे कुटुंब 13 मे रोजी सकाळी 2 वाजता त्यांच्या मूळगावी पांग्रा याठिकाणी आले होते. काही दिवस आगोदर हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संबंधित प्रशासनाने कळवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी त्या मुलीचे कुटुंब नसल्यामुळे त्यांचा शोध प्रशासनाने सुरू केला होता. परंतु ते कुटुंब त्यांच्या मूळ गावी वास्तवात आल्यामुळे जिल्हा रुग्णालय बुलडाणा यांच्याकडून सिंदखेड राजा प्रशासनाला ८ वर्षे मुलीचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तालुका प्रशासनाला माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

पांग्रा गाव संपूर्ण सील
त्यानंतर सिंदखेड राजा प्रशासनाने 8 वर्षे कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या मुलीला व तिच्या संपर्कामध्ये आलेल्या हाय रिक्स कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या १३ जणाला पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी बुलडाणा येथे पाठवण्यात आले. प्रशासनाकडून पांग्रा हे गाव संपूर्ण सील करण्यात आले आहे. या कुटुंबाच्या व आठ वर्षीय मुलीच्या संपर्कामध्ये कोण कोण व्यक्ती आले आहेत याचा शोध प्रशासन घेत आहे. प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

शहरी भागातून हजारो नागरिक ग्रामीण भागामध्ये दाखल
सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक यासह अनेक शहरामधून मुळ गावी दाखल झाले आहे. त्यांची कोणतेही तपासणी करण्यात येत नाही. संबधीत गावच्या प्रशासनाचे याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरामधून आलेल्या नागरिकांना गावामध्ये एका ठिकणी क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहरामधून आलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive report of 8 year old girl from Mumbai return