esakal | VIDEO : कोरोना लसीकरणाचा शुभारंभ, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी ठरले पहिले मानकरी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination starts in amravati

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी येथील डॉक्टर तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवादसुद्धा साधला. 

VIDEO : कोरोना लसीकरणाचा शुभारंभ, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी ठरले पहिले मानकरी

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी (ता. १६) सकाळी दहा वाजतापासून झाला आहे. यावेळी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले आहेत. तसेच माजी आमदार सुनील देशमुख यांनी सुद्धा लस घेतली आहे.

हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 

जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगावबारी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर प्रत्येकी १०० लाभार्थ्यांप्रमाणे ५०० लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. याच लाभार्थ्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे १७ हजार लसींचा डोस प्राप्त आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.

हेही वाचा - महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी येथील डॉक्टर तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवादसुद्धा साधला. 
 

loading image