Video : काय म्हणता? नगर अभियंत्यास नगरसेवकाची प्लॉस्टिकच्या खुर्चीने मारहाण, वरून शिवीगाळही!

chd 1
chd 1

मूल (जि. चंद्रपूर)  : नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी अभियंता राठोड, महेंद्र करकाडे आणि नगर परिषदेचे अधिक्षक विलास कागदेलवार यांनाही मारहाण केल्याची आणि मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून उद्धट उत्तरे दिल्याची तक्रार प्रसाद राठोड यांनी मूल पोलिसात दिली आहे. त्यांचे तक्रारीवरून मूल पोलिसांनी महेंद्र करकाडे यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली.

दरम्यान या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून दिनांक १० पासून नगर परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यांचा निर्णय नपच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.



प्रसाद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही कामे पेंडीग असल्यांने, प्रसाद राठोड हे नगर परिषदेत कामासाठी आले होते. ते परत निघत असतांना बाहेर नगर परिषदेचे सभापती विनोद सिडाम, प्रशांत लाडवे, नगरसेवक अनिल साखरकर उपस्थित होते. विनोद सिडाम यांचेसोबत त्यांचे प्रभागातील कामाबाबत चर्चा सुरू असतांनाच, प्रभाग ७ ब चे नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी प्लॉस्टिकच्या खुर्चीने राठोड यांना मारहाण सुरू केले. शिवीगाळही दिली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा वाद सोडविला. यानंतर, करकाडे यांनी, नपचे विलास कागदेलवार यांनाही मारहाण केली, तर याबाबत माहीती घेण्यांचा प्रयत्‍न करणारे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेशी बाचाबाची करून, उद्धटपणे उत्तर दिले.

सविस्तर वाचा - पत्नी व मुलीला सोडून बहिणीकडे जातो असे सांगितले अन् परतलेज नाही, आठ दिवसांनी 

नगर अभियंता, हे नगरसेवकांचे न ऐकताच स्वमर्जीने कामे करतात, लोकांचा रोष मात्र नगरसेवकांना सहन करावा लागतो. यामुळे अभियंता आणि नगरसेवक यांचेत जुनाच वाद आहे. हा वाद अनेकदा नगर परिषदेच्या मासिक बैठकीतही दिसून येत होता. आज नगर परिषदेच्या आवारातच या अभियंत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे एका नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेचा निषेध केला आहे  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com